🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन....!


🌟जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाव नोंदवावा - सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे 

परभणी (दि.29 जानेवारी) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत  जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी 31 जानेवारी रोजी दुपारी 01.00 ते 2.30 या वेळेत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे व  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस. नरवाडे  मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाव नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे...…...

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या