🌟सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शिक्षण संस्थाचालक हिराजी भोसले सरांचे शैक्षणिक/सामाजिक कार्य कौतुकास्पद🌟
(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षण क्षेत्रातील 'समाज भुषण' श्री हिराजी भोसले सर)
'मान्यवरांच्या उपस्थितीत 'समाज भुषण' सर्वोच्च सन्मान स्विकारताना श्री हिराजी भोसले सर'
लेखक - चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा तालुक्यातील सुहागण सारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात हिराजी भोसले सर यांचा जन्म झाला चांगुलपणा, प्रामाणिकपणा व कामावरील नितांत निष्ठा या जोरावर त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक कमावले.राज्यातील आघाडीचे सडेतोड निर्भिड विचारांचं दैनिक असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात वृत्तांकन करीत असतांना त्यांनी सामान्यांचा आवाज बनून उपेक्षितांच्या वेदना मांडण्याचे महत्वपूर्ण कार्य केले राजकीय पटलावरही त्यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करतांना ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला प्रथमतः प्राधान्य दिले.
शिक्षक ते मुख्याध्यापक ते शिक्षण संस्थाचालक असा त्यांचा थक्क करणारा यशस्वी प्रवास 'जे करु ते उत्तम कर' या धोरणानुसार काम केल्याने त्यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जनगणनेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार,व एनसीसीचा पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना गौरविण्यात आले.आपल्या मुळगाव असलेल्या सुहागण या जन्मभूमीत छत्रपती संभाजी महाराज विद्यालय या नावाची अत्यंत दर्जेदार शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था स्थापन करून ती नावारूपाला आणली त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रोजमजूरांच्या मुलां मुलींची शिक्षणाची सोय झाली तेथेही त्यांनी शिस्त गुणवत्ता व्यक्तीमत्व विकासावर भर दिला असे चौफेर कौतुकास्पद काम करीत असतांना त्यांनी आपल्या प्रतिमेला सदैव जपले त्यावर यत्किंचितही डाग लागू दिला नाही हे विशेष त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.एकूनच त्यांचे कार्य प्रेरणादायी व दिशादर्शक आहे त्यांच्या हातून अशीच राष्ट्र व समाजसेवा घडो हीच सद्भावना... त्यांच्या पुढील वाटचालीस दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या वतीने शतशः हार्दिक शुभेच्छा.....
टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी
0 टिप्पण्या