🌟पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पो.नि.प्रदीप काकडे यांच्या शुभहस्ते दैनिक एकमत दिनदर्शिकेचे विमोचन....!


🌟यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.०१ जानेवारी) :- राज्यातील पुरोगामी विचाराचे आघाडीचे दैनिक एकमत या वर्तमानपत्राच्या दैनिक एकमत- २०२४ च्या  दिनदर्शिकेचे विमोचन आज सोमवार दि.०१ जानेवारी २०२४ रोजी नुतन वर्षाचे औचित्य साधून पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्या शुभहस्तें व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श सेवानिवृत्त शिक्षक जगदीश जोगदंड सर अजित न्यूज हेडलाईनचे मुख्य संपादक तथा शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुर्णा तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार मुजीब कुरेशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन हिवरे, शिवसेना (उबाठा) गटाचे शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम प्रतिष्ठीत व्यापारी संजय पांचाळ दैनिक एकमचे वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी सुशिल गायकवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या