🌟साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन🌟
🌟यशवंत गौरव सोहळ्यास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऊपस्थित रहावे - अध्यक्ष गोविंद यादव
गंगाखेड : एमपीएससीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात गंगाखेड आणि पालम तालुक्यातील गुणवंतांनी यश संपादन केले आहे. यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या यशवंतांचा आज गंगाखेड येथे गौरव केला जाणार आहे. साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगाखेड येथील संत सावता माळी मंदिरात हा कार्यक्रम ऊद्या दि. २६ जानेवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न होईल. बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून ऊपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस ऊपअधिक्षक दिलीप टीपरसे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. ऊपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या सुपा ( ता. गंगाखेड ) येथील मुळ रहिवाशी कु. शितल बालासाहेब घोलप, तहसीलदार पदासाठी पात्र ठरलेले गौंडगाव ( ता. गंगाखेड ) येथील विकास कुकडे, वीस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरलेले पालम येथील विशाल सुरवसे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील यशवंत डॉ. नीलेश नोमाजी गोरे, डॉ. प्रतिक्षा विनोद गुरसाळी ( गंगाखेड ), डॉ. ऋतुराज रघुराज गाडगीळ ( पेठशिवणी ), भारत प्रकाश शिंदे ( मरडसगाव), संकेत महारूद्र ईदाते, ओंकार व्यंकटेश पालदेवार, अंकीता गणेश औटी, प्रियंका धोंडीराम जाधव, स्नेहा राजेभाऊ यादव ( गंगाखेड ) यांचाही याप्रसंगी गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने ऊपस्थित रहावे, असे आवाहन साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, बालासाहेब यादव, संयोजक सागर गोरे, डिगंबर यादव, पसराम गिराम, रंजीत शिंदे आदिंच्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या