🌟नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या : समन्वयकपदी रवींद्र संगनवार तर निमंत्रकपदी प्रदीप नागापूरकर...!


🌟अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांची घोषणा🌟 

मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नांदेड जिल्हा   समन्वयकपदी रवींद्र संगनवार यांची तर जिल्हा निमंत्रकपदी प्रदीप नागापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज मुंबई येथे केली आहे.


राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि कुचकामी ठरलेला पत्रकार संरक्षण कायदा या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा संघटीत आवाज उठविण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती काम करते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात समितीच्या शाखा असून   समन्वयक आणि निमंत्रक यांच्या नियुक्ती केल्या जात आहेत. त्यानुसार नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या  समन्वयकपदी रवींद्र संगनवार यांची तर निमंत्रकपदी प्रदीप नागापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राज्य निमंत्रकांच्या पुर्व परवानगीने निमंत्रक आणि समन्वयक नेमावयाचे आहेत.तसेच जिल्हा आणि तालुका निमंत्रक आणि समन्वयकांनी संघटनेची शिस्त पाळावी असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

या निवडीबद्दल राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, मन्सूरभाई शेख, विजय जोशी, प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे , सरचिटणीस राम तरटे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे,महानगराध्यक्ष शिवराज बिच्चेवार, सचिव सुरेश काशिदे, समन्वयक प्रशांत गवळे, कोषाध्यक्ष गजानन कानडे, किरण कुलकर्णी, नरेश दंडवते, प्रल्हाद लोहेकर, अविनाश पाटील, मनोहर कदम आदिंनी रविंद्र संगनवार आणि प्रदीप नागापूरकर यांचे अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या