🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟सरकार नकारात्मक असतं तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

✍️ मोहन चौकेकर

* मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांना हायकोर्टाकडून नोटीस

* ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा ; इंडिया आघाडीला धक्का

* सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाची मिरज गांधी चौकी हद्दीतील मटका अड्यावर धाडी, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांची तात्काळ नियंत्रण कक्षात रवानगी

* सरकार नकारात्मक असतं तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* मिरजमध्ये मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव यांची मिरज स्थानक येथे भेट, ORH विभगाचे उद्घाटन

* मिरज जंक्शनचा विकास का होत नाही ? रेल्वे महाव्यवस्थापकांना मिरज सुधार समितीचा सवाल

* अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी ; जयंत पाटलांचा युक्तिवाद

* आजोबा शरद पवारांनचा आशीर्वाद, ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आत्याची सोबत; रोहित पवारांची सहा तासांनंतरही चौकशी सुरू

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना काय अधिकार, सर्वात मोठा मिंधा कोण हे जनतेला माहिती आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका*

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ घेणार अयोध्याच्या प्रभू श्रीरामाचं दर्शन

* मिरजेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव यांची धावती भेट, सावित्री बाई फुले वसाहत नागरिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याने योगेंद्र थोरात यांनी वाहनाचा ताफा अडविला

* मिरजेत अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेमधून कोट्यवधीचा निधी खर्ची, पण त्यांचा पुतळा मात्र निधी मंजूर असता

* ईडी म्हणजे भाजपची शाखा या शब्दात संजय राऊत यांची टीका

* विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटे वेळ वाढवून मिळणार

* अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी; हसन मुश्रीफांशी पंगा भोवला

* पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

* LPG गॅस कनेक्शनची संख्या वाढली, 2014 मध्ये 14 कोटी कनेक्शनची संख्या तर आत्ता देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती

*अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या निक्की हॅलेंना झटका; न्यू हँपशर प्रायमरीत ट्रम्प यांचा विजय

*अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

*पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड                        

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या