🌟कर्तव्याची जाणीव,कर्तव्याचे भान जपणारा खाकी वर्दीतील संवेदनशील माणूस... प्रदीप काकडे


 🌟पोलिस दलात कर्तव्य बजावत असतांना त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकीचे भान जोपासले 🌟

(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशासकीय क्षेत्रातील 'समाज भुषण' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे)

'मान्यवरांच्या हस्ते समाज भुषण हा सर्वोच्च पुरस्कार स्विकारतांना कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री प्रदीपजी काकडे

लेखक - चौधरी दिनेश (रणजित)

             कर्तव्याची जाणीव कर्तव्यदक्षतेचे भान...खाकी वर्दीतील संवेदनशील मनाचा माणूस ज्याला जनहीताची जान त्यांच्या कर्तृत्वाने उंचावतेय पोलीस दलाची मान....

परभणी जिल्हा पोलिस दलातील पुर्णा पोलीस स्थानकात कर्तव्य बजावणारे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्या अधिकारी पदाची पार्श्वभूमी बघितल्यास असे निदर्शनास येते की खाकी वर्दीत देखील संवेदनशील मनाचा माणूस असतो. प्रदिपजी काकडे हे कोरोना महामारी काळात नांदेड पोलीस दलात कार्यरत असतांना त्यांनी त्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कामातून दिसून आले. कोरोना काळात जेव्हा मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक जवळ नव्हते तेव्हा या महामारीत मृत्यू पावलेल्या नागरिकांवर त्यांनी स्वतः मुलाप्रमाणे/नातेवाईकां प्रमाणे विधीवत अंत्यसंस्कार केले. त्यांनी केलेल्या या मानवतावादी कार्याची दखल खुद तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे व तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल व विविध वृत्तवाहिन्यांनी देखील घेतली होती.

     कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू या छोट्याशा गावात श्री प्रदीप काकडे यांचा जन्म झाला.गडहिंगलज येथे त्यानी शिक्षण घेतले.वडील भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक असल्याने एका शिस्तीत व संस्कारात ते वाढले. सन १९९५ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात ते कर्तव्यावर रुजू झाले राज्यातील पाच जिल्ह्यांतील १५ पोलीस स्थानकात त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्ष/कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांच्या शिदोरीवर त्यांनी माणूसपण जोपासत काम केले.निसर्गाची व स्वच्छतेची त्यांना आवड असल्याने त्यांनी प्रत्येक पोलिस स्थानकाचे सुशोभीकरण केले.पोलिस प्रशासनांतर्गत येणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकासह विशेष पथकात देखील यशस्वीपणे त्यांनी कर्तव्य बजावले.

पोलिस दलात कर्तव्य बजावत असतांना त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत गरीब व होतकरू कुटुंबातील दोन मुल व दोन मुली शिक्षणासाठी दत्तक घेत त्यांचा सर्व खर्च स्वतः केला. त्यांच्या प्रत्येक गरजा भागवल्या त्याची फलश्रुती म्हणजे त्यांच्या पैकी एक मुलगा न्यायाधीश तर एक मुलगी तहसिलदार झाली तर उर्वरित दोघं अजून शिक्षण घेत आहेत. संवेदनशील मनाचा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हाच त्यांचा सर्वोच्च सन्मान होय त्यांनी दत्तक घेतलेल्या त्या मुला मुलींना पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे हे खाकी वर्दीत साक्षात पांडुरंग वाटतात हिच त्याची त्यांच्या प्रती सन्मानाची भावना त्यांच्या या सर्वोत्तम सेवेला शतश: सलाम...त्यांना पुढील आयुष्यासाठी दैनिक क्रांतीशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा.

आपल्या हातून अशीच निरंतर देश व समाजसेवा घडो हीच सद्भावना.आपणास गौरवतांना आम्हास अतिव आनंद होत आहे........

टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या