🌟तीस वर्षाची जनहीवादी निर्भिड बहुभाषिक पत्रकारिता.....!


🌟शीख समाजातील निर्भिड जनहितवादी पत्रकार सरदार रविंद्रसिंघ मोदी यांना पत्रकार दिवसा निमित्त शुभेच्छा🌟

महाराष्ट्रात बहुभाषिक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची संख्या अल्प अशी आहे. त्यात शीख समाजाचे पत्रकार तर बोटावर मौजन्या सारखे असावे. पवित्र पावन नगरी हजुरसाहिब नांदेड येथे मागील तीस वर्षांहून अधिक काळ संयमी पत्रकारिता करणारे स. रविंद्रसिंघ मोदी हे एकमेव उदाहरण म्हणावे लागेल ज्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी आणि तेलगु वृत्त पत्र सृष्टिसाठी बहुभाषिक पत्रकारिता केली आहे. सन 1992 मध्ये मराठी साप्ताहिक नांदेड डायरी साठी त्यांनी बातम्या आणि लेख लिहिण्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी साप्ताहिक नांदेड विकास वार्ता साठी लेख आणि बातम्या देण्याची सुरुवात केली. सन 1993 मध्ये त्यांनी छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) येथून प्रकाशित हिंदी दैनिक देवगिरि समाचार साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता सुरु केली. सोबतच गुरुद्वारा सचखंड बोर्डात त्यांनी विविध पदावर नौकरी केली. सन 1999 मध्ये त्यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या नौकरिचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ पत्रकारितास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दैनिक लोकमत समाचार वर्तमान पत्रासाठी परभणी जिल्हा संवादाता म्हणून कार्य केले. वर्ष 2000 मध्ये हैदराबाद तेलंगाना येथून प्रकाशित हिंदी दैनिक स्वतंत्र वार्ता वृत्तपत्रच्या नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी आक्रमक आणि समाजोपयोगी पत्रकारितेची उत्कृष्ट सुरुवात करून एक जागरुक पत्रकार म्हणून नावोलौकिक मिळवले.

वर्ष 2004 नोहेम्बर मध्ये त्यांनी गोदावरी शुद्धिकरण आणि घाटसौंदर्यकरणासाठी जनसहभाग मधून श्रमसेवा सारखा उपक्रम राबाविला. तत्कालीन जिल्हाधिकारी श्री तानाजी सत्रे यांनी त्यांच्या श्रमसेवेची दखल घेतली आणि रविंद्रसिंघ मोदी यांचे श्रमसेवा आंदोलनामागचे हेतु काय असे विचारून घेतले. त्यावेळी गोदावरी घाटावरील विद्यमान ऐतिहासिक गुरुद्वाराभोवती सौंदर्यकरण व्हावे आणि गोवर्धनघाट ते श्रीरामघाट पर्यंत घाट बांधवे असे सांगत गोदावरी नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी नाल्यांचे भूमिगत प्रणालीने आउटलेट काढ़ावे अशी सूचना रविंद्रसिंघ मोदी यांनी केली. पुढे चालून गुरुतागद्दी विकास योजनेत त्या सूचनेचा समावेश पाहण्यात आला. ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक नेता दिवंगत सुधाकररावजी डोईफोडे साहेब यांनी दैनिक प्रजावाणी मध्ये अग्रलेख लिहून श्रमसेवा आंदोलची स्तुति केली होती. 

वर्ष 2008 मध्ये नांदेडच्या गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथे श्री गुरु ग्रंथसाहेब त्रिशताब्दी सोहळा आयोजन झाले होते. त्यावेळी त्यांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता केली. त्यांच्या लेखनी मुळे त्रिशताब्दी सोहळ्याची प्रसिद्धी देशभर पोहचली. त्यावेळी त्यांनी हिंदी, मराठी, पंजाबी, तेलगु, इंग्रजी वर्तमान पत्रांच्या पत्रकार मंडळीस मोठी मदत केली. दरम्यान त्यांना राजकारणी, प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड आणि प्रस्थापिता सोबत मोठा संघर्ष देखील करावा लागला होता.

तेलगु दैनिक मुंबई साक्षी साठी त्यांनी पत्रकार म्हणून पाच ते सहा वर्षें उल्लेखनिय असे कार्य केले. शिवाय पंजाबी भाषेतील राष्ट्रीय दैनिक अजित साठी पाच वर्षाहून अधिक काळ कार्य केले. मराठी दैनिक नांदेड वार्ता, दैनिक श्रमिक एकजूट, दैनिक प्रजावाणी, दैनिक सकाळ, दैनिक देशोन्नति, दैनिक प्रतिदिन अख़बार (अमरावती), दैनिक रवि संघर्ष सह अनेक वर्तमान पत्रात त्यांनी बहुभाषिक पत्रकारिता केली. त्यांनी सचखंड ज्योत मासिक आणि साप्ताहिक पत्राचे संचालन देखील केले. पण आर्थिक अडचणीमुळे त्यांचे प्रकाशन थांबवावे लागले. यूट्यूब वर हजुरसाहिब टूडे हा त्यांच्या चैनल नामवंत ठरला होता.

वर्ष 2011 मध्ये त्यांनी नांदेड सोडून छत्रपति संभाजीनगर येथून प्रकाशित राष्ट्रीय दैनिक भास्कर मध्ये उपसंपादक म्हणून कार्य केले. दैनिक सकाळ मध्ये पूर्ण वेळ पत्रकारिता करून त्यांनी शीख समाजाच्या बातम्याना अग्ररूप मिळवून दिले. त्यांनी सचखंड पत्र आणि राष्ट्रीय मासिक पत्रामध्ये लेख लिहिण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हिंदी, मराठी, उर्दू सह इतर भाषेतील प्रभुत्व असल्यामुळे प्रत्येक विषयातील बातम्या आणि लेख ते लिहू शकतात. त्यांनी पत्रकारितेसह विविध पाच ते सहा जनान्दोलाने केली आहे. शासनाच्या भूमिकेमुळे त्यांचे कलम अकरा संशोधनाचे कार्य अर्धांवट असले तरी गुरुद्वारा बोर्डावर स्थानीकांची सत्ता असावी असे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या लिखानामुळेच कलम अकरा आणि कलम सहा संशोधन आंदोलनास जन आंदोलनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजासाठी पत्रकार, फोटोग्राफर, यूट्यूबर, साहित्यिक लेखन, समाज सेवा, शैक्षणिक सेवा देणारे ते एकमेव असे व्यक्तिमत्व असावे. राजकारनापासुन दूर राहणारे पण राजकीयवृती वर कटाक्ष करणारे शीख समाजातील व्यक्तिमत्व सरदार रविंद्रसिंघ मोदी यांना पत्रकार दिवसानिम्मित शुभेच्छा.

लेखक : दिनेश चौधरी (संपादक),

पूर्णा, परभणी.

9766529055

........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या