🌟गुन्हेगाराऐवजी गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्याचा प्रयत्न केला - जसवंतसिंग शाहू


🌟नांदेड पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक जसवंतसिंग शाहू यांची प्रतिक्रिया🌟

नांदेड (दि.३१ जानेवारी) - नांदेड पोलीस सेवेमध्ये रुजू झाल्यापासून गुन्हेगार संपविण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्याचे पोलीस दलाचे ध्येय होते. त्याप्रमाणे निष्कलंक सेवा बजावण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक जसवंतसिंग हजुरासिंग शाहू यांनी दिली आहे.


      नांदेड पोलीस दलामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक संजीव दयाल यांच्या नेतृत्वाखाली 1988 साली रुजू होऊन  38 वर्षाची निष्कलंक सेवा बजावून आज दिनांक 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्तीनिमित्त  सपत्नीक सत्कार पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व एलसीबीचे उदय खंडेराय यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व टीमच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक जसवंतसिंग शाहू यांनी त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यास उत्तर देताना शाहू यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

     जसवंतसिंग शाहू यांना 38 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 235 पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजपर्यंत नांदेड पोलीस दलामध्ये वजीराबाद , मुदखेड , कंधार, स्थागुन्हे शाखेमध्ये कर्तव्य बजावले आहे. जसवंतसिंग हजूरासिंग शाहू यांनी कर्तव्य बजावत असताना सर्वधर्म समभाव मनामध्ये ठेवून समाज विरहित निरपेक्षपणे, द्वेष भावना व राजकीय दबाव झुगारून आपले कर्तव्य बजावले असल्याचे सांगितले.

    यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह एपीआय माने , रवि वावळे, पोलीस उपनिरीक्षक सोनवने, काळे, बोराटे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहू यांच्या सेवानिवृत्तिनिमित्त गुरुदीपसिंग लिखारी, कुलप्रकाशसिंग फौजी, दिलबागसिंग गडगंज, रणजितसिंग शिलेदार, मोहनसिंग जसवात चरणजितसिंग बिंद्रा, राजेंद्रसिंग शाहू, जगदीपसिंग नंबरदार, डॉ. भूपिंदरसिंग मुनीम, प्रेमजितसिंग शिलेदार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या