🌟महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना....!


🌟बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची मिळणार संधी🌟

परभणी (दि.12 जानेवारी) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. सदर उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षीत उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मिडीया चॅनल्सवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारीत करण्यात येणार आहे. 

सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10 हजार पदांसाठी यु.के. मध्ये वैद्यकिय क्षेत्रातील अधिपरिचारीकेच्या 120 जागासाठी तर फिनलँडमध्ये काळजीवाहकच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतचीही माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे. फ्रेमवर्क / शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16 हजार रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल. या पदासाठी साठी 21 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. तरी महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सोशल मिडीया चॅनलमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन विदेशामध्ये रोजगारांच्या संधीचा लाभ घ्यावा. सदर चॅनलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या लिंकला भेट द्यावी व आजच आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र सो खंदारे,  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता परभणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                  

***

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया चॅनेलला भेट द्या आणि सामील व्हा.

• संकेतस्थळ : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic

• संपर्क : 8291662920

• व्हाट्सअप चॅनल : https://whatsapp.com/channel/००२९VaFSFjiKmCPXrPoncr३८

• टेलिग्राम ग्रुप : https://t.me/maharashtrainternational

लिंक्ड इन : https://shorturl.at/hpwQW


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या