🌟पुर्णा तालुक्यातील माटेगाव परिसरातील मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना....!


🌟यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी 'एक मराठा लाख मराठा' अश्या गगनभेदी घोषणा दिल्या🌟 

पुर्णा (दि.२० जानेवारी) - मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंतरवाली सराटी ते मुंबई पायी वारीत माटेगाव सह परिसरातील एरंडेश्वर, कातनेश्वर,आहेरवाडी,नावकी आदी गावातील समाज बांधवांनी गावातील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन छत्रपती संभाजी महाराज चौकातून प्रस्थान केले.

 मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण मिळावे, याकरिता शनिवारी अंतरवाली सराटी येथुन मुंबईकडे लाखोंच्या संख्येने पायी पदयात्रा निघणार आहे. परिसरातून गावागावातून तरुण मराठा बांधव रवाना झाले यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत आरक्षण मिळणारच असा निर्धार करत परिसर दणाणून सोडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या