🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे जिल्हा परिषद डिजिटल शाळेच्या सभागृहाचे १४ जानेवारी रोजी लोकार्पण.....!


🌟या कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील असणार आहेत🌟


 
पुर्णा (दि.१२ जानेवारी) : जन स्वराज्य फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुहागन यांच्या अथक परिश्रमामुळे साकारण्यात आलेल्या सुहागन येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेचा व सार्वजनिक सभागृहाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार १४ जानेवारी रोजी केले आहे. 

या कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील असणार आहेत . प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे , पोलीस अधीक्षक रागसुधा आर . , शिक्षणाधिकारी ( प्रा ) गणेश शिंदे , शिक्षण अधिकारी ( यो ) संजय ससाने , उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर , तहसीलदार माधव बोथीकर , गटविकास अधिकारी मयूरकुमार अंधेलवाड , गटशिक्षणाधिकारी मारुती सूर्यवंशी , कृषीभूषण कांतराव देशमुख , ज्येष्ठ समाजसेवक डॉ . दत्तात्रय वाघमारे , कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी भोसले , आयोजक रामराजे भोसले अध्यक्ष जन स्वराज्य फाउंडेशन यांची उपस्थिती असणार आहे . या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जन स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या