🌟मानव जोडण्याचा स्तुतिदायक उपक्रम : लड्डूसिंघ महाजन


🌟पूर्णा शहरात दर्पण दिना निमित्त विविध क्षेत्रातील आठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा संपन्न🌟


🌟शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन🌟

पुर्णा  (दि.०७ जानेवारी) - कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान त्याला उर्जा प्रदान करतो परंतु त्याहीपेक्षा इतरांना उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका पार पाडत असतो असे प्रतिपादन प्रतिपादन गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंघ महाजन यांनी केले. 


      शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य निमंत्रक जगदीश जोगदंड सर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,सचिव स.रविंदरसिंघ मोदी, उपाध्यक्ष स.हरदयालसिंघ संधू,सहसचिव देवेंद्र राठोड,सदस्य चौधरी अजित,तसेच मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी, शहराध्यक्ष मोहन लोखंडे आदींनी दर्पण दिनाचे औचित्य साधून काल शनिवार दि.०६ जानेवारी रोजी येथील नगर परिषदेच्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील  कर्तबगार मान्यवरांच्या व पत्रकार सम्मान कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्हा शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विशाल कदम,जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी गोपाळ काटोले ,बाबा फतेहसिंघजी, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,माजी नगरसेवक सुनीलभैय्या जाधव,ॲड.रोहिदास जोगदंड, डॉ. हरिभाऊ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री. महाजन  म्हणाले , सचोटी, प्रामाणिकपणा जपत व माणूस केंद्रबिंदू मानून काम करत गेले तर राष्ट्र घडत असते. त्याग व निष्ठाच माणसाला सन्मानास पात्र बनवित असते.माणवतेची पूजाच सर्व धर्माचे सार आहे. पूर्णा शहरात हा सम्मान स्वीकारतांना खूप आनंद होत आहे. यावेळी त्यांनी सरदार उधमसिंघजी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ॲड भालेराव यांनी प्रास्ताविकात शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्राच्या वतीने प्रत्येक वर्षी दर्पण दिनाचे औचित्य सन २०११ पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा सत्कार केला जातो असे सांगितले. यावेळी मुख्य संपादक धम्मपाल हानवते यांच्या दैनिक क्रांतीशस्त्रच्या दर्पण दिन विशेष अंकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन विशाल कदम यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जेष्ठ समाजसेवी तथा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे तब्बल दोन वेळेस अध्यक्षपद भुषविलेले आदर्श व्यक्तीमत्व जेष्ठ समाजसेवी सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन, प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे, व्यापार क्षेत्रातील निष्कलंक व्यक्तीमत्व प्रतिष्ठीत जेष्ठ व्यापारी अशोकराव कुल्थे,राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी ,  औषधी उद्योग क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवा उद्योजक नितीन कैलास कापसे,शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत  सुहागण सारख्या छोट्याश्या गावात छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाची स्थापना करुन ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रोजमजूरांसह गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाची सर्वोच्च संधी उपलब्ध करून देणारे हिराजी भोसले, तालुक्यातील माखणी सारख्या छोट्याश्या गाव खेड्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणारे शेतकरी जनार्धन आवरगंड,कृषी पुरक उद्योगांतर्गत संत तुकाराम महाराज दुध डेअरीची स्थापना करुन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय देणारे सुरेश शिंदे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा पार पडला. यावेळी तालुक्यातील विकासात्मक वाटचालीत आपली लेखणी झिजवत मोलाचं योगदान देणाऱ्या जेष्ठ पत्रकार बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रस्तावित ॲड राजेश भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले. अतुल शहाणे यांनी आभार मानले. 


          कार्यक्रमास नांदेड येथील स.जीतसिंघ दुकानदार,स. दिलीपसिंघ रागी, स. इंदरजीतसिंघ गडगंज, स. जसपालसिंघ लांगरी,स.जगजीतसिंघ खालसा,स.डॉ.चरणजीतसिंघ महाजन, स. गुरप्रीतसिंघ महाजन,स.हरप्रीतसिंघ मुनीम,स.अंकितसिंघ गाडीवाले,स.अजीतसिंघ तर परभणी येथील देवा पाटील, दिलीप बोरुळकर,धर्मभूमीचे संपादक मदन (बापू) कोल्हे, संपादक संघपाल अडागळे, देवेंद्र उर्फ मुन्ना राठोड, मुजीब कुरेशी, मोहन लोखंडे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजु नारायणकर,रामा पारवे,सचिन तळणकर,किशोर सुर्यवंशी, सय्यद सलीम सुहागणकर,आकाश भगत,आकाश अंगारखे यांनी विशेष सहकार्य केले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या