🌟पुर्णेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा व अभिवादन सभेचे १४ जानेवारी रोजी आयोजन...!


🌟तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व परभणी जिल्हा  भुषण उत्तमभैया खंदारे यांच्या वतीने दरवर्षी केले जाते आयोजन🌟


परभणी/पुर्णा (दि.१२ जानेवारी) - महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर नंतर आंबेडकरी व धम्मचळवळीचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुर्णा शहरामध्ये परभणी जिल्हा समाज भुषण माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तमभैया खंदारे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या तथागत मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी १४ जानेवारी रोजी मागील २१ वर्षांपासून भव्य स्वरूपात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदंत डॉ उपगुप्तजी महास्थवीर व बुद्ध विहार पुर्णा येथील पुज्य भन्ते पंय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे तर यानंतर सकाळी ११-०० ते ०२-०० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयातल्या अर्थशास्त्र (कला) विभागातील प्रा.डॉ.मुरलीधर इंगोले यांच्या भिम व बुध्द गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

तथागत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्यात नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यात येणार असून यावेळी मान्यवरांच्या विचारातून नामांतर चळवळीतील आठवणींना उजाळा देखील दिला जाणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे तर या कार्यक्रमासाठी व्याख्याते व सत्कारमूर्ती म्हणून सुप्रसिद्ध लेखक भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक तसेच महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अप्रकाशित साहित्य समितीचे सदस्य/सचिव डॉ प्रदिप आगलावे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून या भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव रवि वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत तर तथागत मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ पॅंथर नेते विजयजी सोनलने यांना पॅंथर रत्न म्हणून तर जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स वेबवृत्त वाहिनीचे मुख्य संपादक चौधरी दिनेश यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तथागत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुर्णेचे माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम,माजी उपनगराध्यक्ष यादवराव भवरे, जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे,माजी नगराध्यक्ष मोहन मोरे, गौर येथील सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राजभोज, प्रशासकीय क्षेत्रातील 'समाज भुषण' पुरस्कार प्राप्त पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे,पुर्णेतील राजकीय क्षेत्रातील कर्तृतवान व्यक्तीमत्व मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे, मानवत नगर परिषदेचे मा.नगरसेवक राजू खरात,वसमत नगर परिषदेचे मा.नगरसेवक राजकुमार एंगडे, वसमत तालुक्यातील जेष्ठ रिपाइं नेते गौतम मोगले,मा.नगराध्यक्ष हाजी कुरेशी,प्राचार्य डॉ केशव जोंधळे,पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर,प्रा.राजकुमार सर,प्राचार्य राम धबाले सर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे,मा.नगराध्यक्ष जाकेर कुरेशी तर प्रमुख उपस्थितांमध्ये मा.नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित,जेष्ठ मा.नगरसेविका सन्माननीय सौ.गयाबाई मुगाजी खंदारे,जेष्ठ मा.नगरसेविका सौ.निलावतीबाई गणपतराव पंडित,मा.नगरसेविका सौ.रेखाताई अनिल खर्गखराटे,मा.नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,या.नगरसेवक विरेश कसबे,मा.नगरसेवक मधुकर गायकवाड,मा.नगरसेवक मुकुंद भोळे,मा.नगरसेवक महेबुब साहब कुरेशी,मा.नगरसेवक देवराव खंदारे,मा.नगरसेवक अनिल खर्गखराटे,या.नगरसेवक अशोकराव धबाले,मा.नगरसेवक सुनिलजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अखिल अहेमद आदी मान्यवरांसह भारतीय बौद्ध महासभा, विद्यमान आजी/माजी पदाधिकारी तसेच तालुका/शहर शाखा तसेच पुर्णेतील सर्व महिला मंडळ,सामाजिक संघटनांसह तथागत मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती राहणार आहे.

तथागत मित्र मंडळ आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा व अभिवादन सभेत तमाम आंबेडकरी विचारवंतांसह समाज बांधव माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्य संयोजक तथा मा.उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांनी केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या