🌟परभणीत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वातील पत्रकार रॅलीचे जोरदार स्वागत..!


🌟शहरातील शासकीय सावली विश्रामगृहात या पत्रकार रॅलीचे ढोल ताशाच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले🌟  


  
परभणी (दि.१२ जानेवारी) - मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या  वतीने बीड ते माहूर अशी श्री एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पत्रकार रॅलीचे आज परभणीत पत्रकारांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.


याबाबत माहिती अशी की शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा श्रीक्षेत्र माहूर येथे होत आहे या  मेळाव्यासाठी बीड ते माहूर अशी श्री एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार रॅली काढण्यात पत्रकार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे बीड, वडवणी, देवडी, माजलगाव, पाथरी, मानवत मार्गे आज ही पत्रकार रॅली परभणीत आली होती येथील शासकीय सावली विश्रामगृहात या पत्रकार रॅलीचे ढोल ताशाच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री एस एम देशमुख व व त्यांच्यासोबत रॅलीत आलेल्या 75 ऊन अधिक पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला याप्रसंगी बोलताना श्री एस. एम  देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेची वाटचाल विषद केली.  राज्यातील शासनकर्ते पत्रकारांच्या प्रश्नावर चालढकल करत आहेत. पत्रकार पेन्शन योजना असो की पत्रकार संरक्षण कायदा त्यांची अंमलबजावणी करण्यात येत नाही. पत्रकारांचे   अधिस्वीकृती प्रश्न असो की सध्या साप्ताहिकांचे प्रश्न असो कोणत्याही   समस्या सोडायच्या नाहीत असं शासनाचे धोरण आहे. या धोरणाच्या विरोधात उद्या 13 जानेवारी रोजी माहूर येथे एल्गार करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी राज्य राज्य डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सौ शोभना देशमुख यांचीही  उपस्थित होती .परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने  परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष  प्रभु दीपके, लक्ष्मण मानोलीकर, बंडू बनसोडे, विठ्ठल वडकुते, संघपाल आढागळे,सुधाकर श्रीखंडे, शिवशंकर सोनवणे, पांडुरंग अंभोरे, प्रमोद अंभोरे, विठ्ठल वडकुते, मोहम्मद इल्यास, लक्ष्मण बागल, माणिक शिंदे, कांचन कोरडे, मंदार कुलकर्णी, सुनील सुतारे, घनसावंत, दिलीप बनकर, भूषण मोरे, धमपाल हानवते,लक्ष्मीकांत जवळेकर, शिवाजी शिराळे,  जनार्धन आवरगंड, बाळासाहेब राऊत,सचिन सोनकांबळे, फेरोज पठाण,रवी कनकटे, शमीम पठाण आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या