🌟पुर्णा शहरात मध्यरात्री वाहन चोरट्यांची घुसखोरी अन् काही क्षणातच केली पुर्णा-बरबडी रोडवरुन एका टिप्परची चोरी.....!


🌟शहरातील गजानन महाराज मंदिरामागील टिप्पर पळवून अज्ञात चोरट्यांनी गौर शिवारात बंद केले वाहनातील जिपीएस🌟

पुर्णा (दि.२६ जानेवारी) - पुर्णा शहरातील पुर्णा-बरबडी रस्त्यावरील श्री गजानन महाराज मंदिराच्या मागील बाजूस एका गॅरेज समोर उभा असलेले टिप्पर क्रमांक एम.एच.०४ सीपी ४७४२ हे वाहन मध्यरात्रीच्या सुमारास शहरात घुसखोरी करीत अज्ञात चोरट्यांची काल गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री ०१-३० ते ०२-०० वाजेच्या दरम्यान पळवून नेल्याची घटना घडली असून वाहन चोरट्यांनी सदरील वाहन पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरुन चोरी करुन नेत असतांना त्या वाहनातील जिपीएस गौर शिवारात काढून टाकल्यामुळे सदरील वाहन चोरट्यांनी चुडाव समोरील वसमत फाटा मार्गे हिंगोली जिल्ह्यात पळवले की चुडावा-लिंबगाव मार्गाने नांदेड जिल्ह्यात पळवले यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून सदरील घटनेच्या दरम्यान शहरातील अनेक भागात एक आंध्र प्रदेश पासिंगची पांढऱ्या रंगाची टाटा सफारी संशयास्पदरीत्या फिरतांना आढळून आल्याचेही निदर्शनास आले.


 दरम्यान पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे व सहकारी पोलीस पथकाने या संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या टाटा सफारी गाडीचा देखील पाठलाग केला परंतु सदरील गाडी पोलीस पथकाला हुलकावणी देऊन पसार होण्यात यशस्वी झाल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते या घटने संदर्भात टिप्पर मालक नागनाथ त्र्यंबकराव दावलबाजे राहणार देगाव तालुका पुर्णा यांनी आज शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी पुर्णा पोलीस स्थानकात प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात टाटा कंपनीचे जुने टिप्पर वाहन अंदाजे किंमत ०४ लाख रुपयें चोरी केल्या प्रकरणी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या