🌟भव्य स्वरूपात साजरा होणारा संविधान गौरव सोहळा शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे🌟
आंबेडकरी व धम्म चळवळीच मराठवाड्यातील प्रमुख केंद्र असलेल्या पूर्णा शहरांमध्ये गेली 21 वर्षापासून भारतीय संविधानाचा जागर सातत्यपूर्ण होत आहे.सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत दलित पॅंथर चळवळीतील अग्रणी भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रकाश कांबळे यांच्या संकल्पनेमधून निर्माण झालेला संविधान गौरव सोहळा पूर्णा शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.
पूर्णा शहरांमधून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोहोचलेली आहे.महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांनी संविधान गौरव सोहळ्यामध्ये पारित केलेले ठराव संविधान अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये केलेली मागणी फलश्रूत झाली आहे.त्याचाच परिणाम शाळा महाविद्यालयामध्ये संविधान दिन प संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन पहावयास मिळत आहे.दोन दशकापूर्वी संविधान गौरव सोहळ्याचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम साहित्यिक आंबेडकरी विचाराचे भाष्यकार आदरणीय डॉ. यशवंत मनोहर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामांतर चळवळीतील अग्रणी पॅंथर नेते माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सर्व जाती-धर्माच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेने हा संविधान गौरव सोहळा अनुभवला.भारतीय संविधान गौरव सोहळा समिती यामध्ये सर्व जाती धर्मातील उच्चशिक्षित प्राध्यापक डॉक्टर इंजिनिअर राजकारणातील समाजकारणातील धम्मकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे.संविधान गौरव समितीच्या कल्पकते मधून अनेक गणमान्य विचारवंताचे व्याख्याने आयोजित केलेली आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने इंदिरा आठवलेप्रा .बापूराव जगताप एडवोकेट विष्णू ढोबळे प्राचार्य डॉ. डोंगरगावकर माजी मंत्री खासदार प्राचार्य फौजिया खान माजी मंत्री महादेव जानकर कॉम्रेड भालचंद्र कांगो या व इतर अनेक मान्यवरांना बोलावून भारतीय संविधानाच महत्व जन माणसाला विशद केले.संपूर्ण जगामध्ये भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे जगाने व जागतिक विचारवंतानी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासकांनी मान्य केले आहे.भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये भारतीय संविधानामुळे देशाची एकता अखंडता सार्वभौमत्व मजबूत आहे.स्वातंत्र्य समता बंधुत्व धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वामुळे भारतामधील शोषित पीडित वंचित कष्टकरी कामगार अगदी सामान्य पासून ते उद्योगपती पर्यंत गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हक्काचं रक्षण करण्याचे काम भारतीय संविधान करत असत.त्यामुळेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय चंद्रचूड साहेब यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
जगामध्ये विविध धर्म आहेत सर्वच धर्मामध्ये मानवतेची शिकवण दिल्या जाते परंतु त्या धर्मग्रंथापेक्षाही भारतीय संविधान तमाम भारतीयांसाठी सर्वोच्च आचार ग्रंथ आहे.भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक भारतवासीयाने आचरण केल्यास भारत हा जगामधील शक्तिशाली देश म्हणून पुढे येईल यामध्ये दुमत नाही.संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये राज्यकर्त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये राज्यकर्ते कमी पडताना दिसत आहे.आणि त्यामुळेच देशांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत.संविधान गौरव सोहळ्या मधून भारतीय राज्यघटनेचे महती व्यापक प्रमाणामध्ये विशद होताना दिसते.
पूर्णा शहरामध्ये अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महा थेरो व भदंत पयावंश बुद्ध विहार पूर्णा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 26 जानेवारी व 27 जानेवारी या दिवशी संविधानाचा जागर पूर्ण शहरांमध्ये होणार आहे.दिनांक 26 जानेवारी या दिवशी सकाळी दहा वाजता डॉ. आंबेडकर चौक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात येणार आहे.दिनांक 27 जानेवारी या दिवशी डॉ. आंबेडकर नगर पूर्णा येथून दुपारी साडेबारा वाजता संविधान गौरव सोहळ्याची वाद्य वृंदासह भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचा मुख्य आकर्षण प्राध्यापक बंडू गायकवाड यांच्या पंचशील नाट्य ग्रुपचं असणार आहे.
पंचशील नाट्य ग्रुपच्या मुलींचे भारतीय संविधानावर आधारित पथनाट्य लेझीम पथक संविधानाची महती गाणारे श्रवणीय गीते पंचशील नाट्य ग्रुपच्या विद्यार्थिनी सादर करणार आहेत.डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये सुप्रसिद्ध प्रबोधनकार शाहीर विजय सातोरे संचासह संविधान गीते सादर करणार आहेत.संविधान गौरव सोहळ्याच्या भव्य मिरवणुकीचा समारोप डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी जाहीर सभेमध्ये होणार आहे.सभेचे उद्घाटक म्हणून औरंगाबाद संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार इम्तियाज जलील प्रदेशाध्यक्ष ए आय एम आय एम हे असणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉ. मोहनराव मोरे तर प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य रिपब्लिकन नेते माननीय रमेश गायकवाड औरंगाबाद त्याचप्रमाणे लातूर येथील भारतीय संविधानाचे अभ्यासक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर भगवान वाघमारे हे असणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मौलाना शमीम अहमद रिझवी माजी नगराध्यक्ष विशाल कदम माजी नगरसेवक संतोष एकलारे श्रीनिवास काबरा माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्ग खराटे मुकुंद भोळे दादाराव पंडित एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड मधुकर गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे एडवोकेट इम्तियाज जलील बँक मॅनेजर चंद्रकांत कचवे नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौल प्राचार्य राम धबाले बँक मॅनेजर गोपाळ काटोले नितीन कदम अखिल अहमद चांद साब बागवान दिगंबर कऱ्हाळे प्रवीण अग्रवाल विशाल चितलांगे आनंद अजमेरा अशोक जयस्वाल हनुमान अग्रवाल मोहम्मद शफीक तुषार गायकवाड पत्रकार दिनेश चौधरी खुद्दूस भाई मगदूम कुरेशी लतीफ भाई ताज आदी असणार आहेत.
संविधान गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी संविधान गौरव समितीचे प्राध्यापक अशोक कांबळे डॉक्टर आदिनाथ इंगोले डॉक्टर प्रकाश मोगले डॉक्टर संतोष हंकारे कॉम्रेड अशोक व्ही कांबळे सुनील जाधव विजयकुमार जोंधळे पत्रकार मोहन लोखंडे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे शिवाजी वेडे भारत जोंधळे सिद्धार्थ भालेराव रोफ कुरेशी बालासाहेब राऊत गौतम दीपके प्रवीण कनकुटे किशन ढगे आदी प्रयत्नशील आहेत.
पूर्णा शहरासारखे संविधान गौरव सोहळे संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरे व्हावेत.भारतामधील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा या मधूनच भारतीय लोकशाही सुदृढ होईल.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध भारत निर्माण होईल या मध्ये शंका नाही....
श्रीकांत हिवाळे सर
पूर्णा जिल्हा परभणी.
9545082301
0 टिप्पण्या