🌟पुर्णेतील सिद्धार्थ नगर येथील जेष्ठ नागरिक गोविंदराव संभाजी जोंधळे महागावकर यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे🌟

पुर्णा : पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथील जेष्ठ नागरिक गोविंदराव संभाजी जोंधळे महागावकर यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज रविवार दि.२८ जानेवारी रोजी दुपारी २:०० वाजता सिध्दार्थ नगर येथून निघणार असून येथील बौद्ध स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कालवश गोविंदराव संभाजी जोंधळे हे रेल्वे कर्मचारी भीमराव गोविंदराव जोंधळे, दिलीप गोविंदराव जोंधळ व विलास गोविंदाराव जोंधळे यांचे वडील होते या व्यतिरिक्त त्यांना तीन मुली आहेत.

गोविंदराव संभाजी जोंधळे हे प्राचार्य डॉ.केशव विठ्ठलराव जोंधळे, ॲडव्होकेट राजकुमार रामराव जोंधळे व डॉ.संदीप मारोतराव जोंधळे यांचे ते काका होते. 

🌸🌼🌸भावपूर्ण श्रद्धांजली🌸🌼🌸

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या