🌟हिंदु धर्माचे आराध्यदैवत श्रीप्रभूरामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सुट्टी जाहीर करा.....!


🌟परभणी जिल्हा प्रशासनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकडे🌟

परभणी : समस्त हिंदु धर्माचे आराध्यदैवत श्रीप्रभूरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी 2024 रोजी विशेष अधिकारांतर्गत सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका शिष्टमंडळाने केली.

          जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मनसे विद्यार्थी सेनेचे अर्जून टाक, तालुका संघटक लखन गरुड, उपशहराध्यक्ष श्रीकांत पाटील, तेजस संघई, आशिष जैन, अक्षय टाक, सूर्यकांत मोगल आदींनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली व एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, 22 जानेवारी रोजीचा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्याकरीता प्रत्येक भारतीय प्रयत्नशील राहणार आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी, उच्च शिक्षण घेणारे युवक यांना हा क्षण पाहण्याचे भाग्य मिळत आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णय क्रमांक पी. 13 बी. आणि 6 ऑगस्ट 1958 च्या सम क्रमांकाच्या निर्णयानुसार विशेष अधिकारांतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयांना 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या