🌟पुर्णा नगर परिषदेच्या निष्क्रिय व भोंगळ्या कारभारा विरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचा एल्गार.....!


🌟विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना शहराध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांनी नगर परिषदे समोर केली उपोषणाला सुरुवात🌟


पुर्णा (विशेष वृत्त : चौधरी दिनेश) - परभणी जिल्हा प्रशासनाने पुर्णा नगर परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हातात सोपवल्यानंतर नगर परिषदेतील प्रशासकीय कारभार निश्चितच सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु शहरवासीयांचे दुर्दैवच म्हणावें लागेल की लोकमतातून निवडून येऊन शहरातील नागरीसुविधांसह शहरातील विकासात्मक घडामोडीत जो भ्रष्टाचाराचा उद्रेक या लोकप्रतिनिधींना जमला नाही त्याहीपेक्षा भयानक भ्रष्ट कारभाराचा उद्रेक प्रशासनाच्या कारकिर्दीत भ्रष्ट नौकरशहांनी माजवून कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची अक्षरशः धुळधाण करीत सर्वसामान्य नागरिकांसह अपंगांना देखील त्यांच्या अधिकार व हक्कापासून वंचित ठेवण्याचे महापाप आरंभल्यामुळे आज बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना शहराध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांनी नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय व भोंगळ्या कारभारा विरोधात एल्गार पुकारत नगर परिषद प्रशासकीय इमारती समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.


पुर्णा शहर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने नगर परिषदेचे   अकार्यक्षम मुख्याधिकारी युवराज पौळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात नगर परिषदेच्या अदृश्य वार्षिक उत्पन्ना संदर्भात मागणी करण्यात आली असून यासह पुर्णा शहरातील नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवणाऱ्या मनमानी वाढीव कराचे दर एकूण जवळपास वीस मार्गाने दि.०७ सप्टेंबर २०२२ वरील पावती क्रमांक व दिनांक सहीत माहिती देण्याची मागणी तसेच माहे २०२३ मध्ये ०५ टक्के निधी कोणत्या उत्पन्ना आधारें वाटप करण्यात आले त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी तसेच अपंग बांधवांना शासन निर्णयानुसार ५० टक्के घरपट्टी माफ करण्यात यावी व विविध शासकीय घरकुल योजनांतून अपंग बांधवांना त्वरित घरकुल मंजूर करण्यात यावे यासह अपंग बांधवांना स्वावलंबी होण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या मालकीची २०० चौरस फुट जागा रितसर ठराव पास करुन देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या असून आदीं मागण्यांची नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पुर्तता करावी यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटना शहराध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांनी नगर परिषदे समोर उपोषणाला सुरुवात केली आहे....‌


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या