🌟परभणी जिल्हा गुटखा बंदी कायद्यासाठी प्रशासनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात नसावा बहुतेक ?


🌟परभणीचे संभाजी  सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांचा संतप्त सवाल🌟

राज्यात गुटखा बंदी कायदा लागू असतांना देखील परभणी जिल्हात मात्र गुटख्यावर कुठल्याही प्रकारची बंदी नाही परभणी शहरासह जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात तसेच शहर परिसरात गुटखा बंदी कायदा लागू नसल्याचे निदर्शनास येत असून संपूर्ण जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री होत आहे खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाने लगाम लावून गुटखा बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायलाच हवी परंतु दुर्दैवाने म्हणावे लागते की गुटखा बंदी लागू झालेल्या महाराष्ट्र राज्यात परभणी जिल्हा हा आहे किंवा नाही? कदाचित जिल्हा प्रशासनाच्या दुष्टीने परभणी जिल्ह्यात नसावा बहूतेक ?

परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वत्र सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याने गुटखा शौकीनांना अगदी सहज गुटखा पुड्या मिळत असल्याने गुटख्याच्या आकर्षणामुळे महिलांसह अल्पवयीन शाळकरी मुले-मुली देखील बळी पडत आहेत काही विषारी गुटख्यामुळे कॅन्सरसारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतांना देखील दिसत आहे.परभणी शहरात तर सर्वत्र गुटखा बंदी कायदा झुगारून खुलेआम मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री सुरू असून शहरात काही होलसेल विक्रेत्यांमार्फत तालुक्यातील खेड्यापाड्यातील छोट्या दुकानदारांना विक्रीसाठी खुलेआम माल पुरविला जातो यातून विक्रेत्यांना कुणाचीही भीती नसल्याचे स्पष्ट होते.

या गुटखा बंदी चा नावा खाली गुटखा विक्रेत्यांना मालासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. शहरासह तालुक्यातील प्रत्येक लहान-मोठा दुकानदार खुलेआम गुटख्याची विक्री करताना दिसत आहे. बंदी असतानाही सर्रास गुटखा विक्री करणाऱ्यांना  प्रशासनाने संरक्षण तर दिले नाहीना, असा प्रश्न उपस्थित होतो तर गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवालही उपस्थित होतो. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील बेकायदा गुटखा विक्रीकडे लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सतत संभाजी सेनेच्या मधमातून मी करत आहे .

आजचा तरुण दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जाताना दिसत असून,  गुटखा विक्री बंद करून अवैध धंद्याला आळा घालण्यात यावा. वरिष्ठ पातळीवरून यासाठी कारवाई होणे आवश्यक आहे. गुटखा पिचकाऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणांची दुर्दशा होत आहे. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई व दंड करण्याचा नियम मोडीत काढून शासकीय निम शासकीय कार्यालय रगलेली दिसत आहेत छुप्या मार्गाने मिळणाऱ्या पुढ्या खाऊन थुंकीच्या पिचकाऱ्या मारणे सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शहरातील सर्वच जुन्या-नवीन शासकीय इमारतींच्या भिंतीची पार दुरवस्था झाली आहे.....


                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या