🌟राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणारा लोकहितवादी लोकप्रतिनिधी....!


🌟पुर्णा नगर परिषद नगरसेवक/नगराध्यक्ष ते शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांचा यशस्वी राजकीय प्रवास🌟

(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे राजकीय क्षेत्रातील 'समाज भुषण' माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी)


'मान्यवरांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार सन्मानपूर्वक स्विकारतांना हाजी कुरेशी यांचे सुपुत्र सोहेल कुरेशी'

लेखक - चौधरी दिनेश (रणजित)

पुर्णा नगर परिषद नगर परिषदेच्या सन १९९५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगर सेवक पदावर निवडून आल्यानंतर जवळपास मागील तिन दशकांपासून राजकीय/सामाजिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणारा लोकहितवादी लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांच्याकडे बघितले जाते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या संघटन कौशल्यावर जोरावर आज राज्यस्तरीय पदापर्यंत मजल मारली आपल्या पद प्रतिष्ठेच्या जोरावर मुबलक प्रमाणात शासकीय विकासनिधी खेचून आणत त्यानी शहरातील विविध विकासकामांना चालना दिली याचा पुर्णेकर तमाम पुर्णेकरांना सार्थ अभिमान वाटतो.

     पुर्णेत सन १९६९ साली त्यांचा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला परिस्थितीमुळे ते जास्त शिक्षण घेऊ शकले नाही तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या आड शिक्षणाचा मुद्दा कधीच आला नाही.पुस्तके वाचण्यापेक्षा मानसं वाचने व मानसं जोडणे हिच भुमिका घेत त्यांनी पुर्णेच्या राजकीय पटलावरील धाडसी व महत्वपूर्ण व्यक्तीमत्व म्हणून आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केला.सन १९९६ पासून सातत्याने लोकप्रतिनिधी निवडून येत त्यांनी जनहीताशी बांधिलकी जोपासत विकासात्मक कामे केली नगर परिषद नगराध्यक्ष म्हणून आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी रचनात्मक काम केलीत.आजता गायत त्यांच्या कामांचा झंझावात सुरुच आहे.

   आपल्या मधूर भाषा शैलीने व विकासात्मक कामाने सर्वांनाच आपल्याकडे त्यांनी आकर्षित केले त्यांचे दातृत्वही लक्षवेधी असतें अनेक गरजवंतांना त्यांनी सदैव मदतीचा हात देत शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रिडा,धार्मिक,सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सदैव मदतीचा हात खुला ठेवला त्यांच्या राजकीय व सामाजिक उपक्रमांना भविष्यातही अशीच झळाळी प्राप्त होवो व शहरासह राज्य राष्ट्राची लोकसेवा त्यांच्या हातून अशीच चिरंतर घडत राहो हीच सद्भावना त्यांच्या पुढील कार्यास दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या शतशः हार्दिक शुभेच्छा....

टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या