🌟शहीद सरदार उधमसिंग फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांचा सन्मान....!


🌟पुर्णा नगर परिषदेतील सभागृहात दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान🌟


परभणी - सामाजिक बांधिलकी पत्करून, 'माणुसकी ' जपत परभणीचे जेष्ठ पत्रकार मदन( बापू )कोल्हे, वयाची पंचाहत्तरी ओलांडून ही आपल्या सायकलवर , पत्रकारितेच्या माध्यमातून अर्धशतकावरील कालावधीपासुन करत असलेल्या समाजहिताचे कार्याची विशेष दखल ,शहीद सरदार उधमसिघ फाउंडेशन ने घेऊन ,पत्रकार दिनी पूर्णा येथे सहा जानेवारी रोजी दर्पण दिनी आयोजिलेल्या कार्यक्रमात,पूर्णा नगरीचे प्रदीर्घ  कालावधीपर्यंत नगराध्यक्षपद भूषविलेले ,ज्येष्ठ नेते उत्तमदादा कदम,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे व शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख, मा. नगराध्यक्ष विशाल कदम व रि.पा.ईं.चे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे यांचे हस्ते मदन (बापू)कोल्हे यांचा शाल ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्काराने गौरव केला आहे.नांदेड येथील गुरूद्वारा तख्त सचखंड बोर्डाचे दोन वेळा चेअरमनचा पदभार सांभाळलेले सरदार लड्डू सिंग महाजन यांनी ही मदन (बापू) कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या.

🌟यावेळी विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा ह्रदयस्पर्शी सत्कार करण्यात आला :-

 याप्रसंगी पुर्णा नगर परिषदेचे  माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी, मा.नगरसेवक संतोष आप्पा एकलारे, मा.उपनगराध्यक्ष तथा तथागत मित्रमंडळाचे अध्यक्ष उत्तमभैया खंदारे , मा.सभापती तथा संस्थाध्यक्ष एडवोकेट अब्दुल मजीद , एस.बी.आय . बॅकेचे व्यवस्थापक गोपाळ काठोळे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .

शहीद सरदार उधमसिघ फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश चौधरी ,निमंत्रक जगदीश जोगदंड व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित या कार्यक्रमास पूर्णेचे नागरिक व पत्रकारांसह परभणी व नांदेड जिल्ह्यामधील मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या