🌟ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सवलत....!


🌟असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झुंजारे यांनी केले🌟 

परभणी (दि.१९ जानेवारी) : महाराष्र्  राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेत एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि.३१ मार्च २०२४ पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झुंजारे यांनी केले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या