🌟मानव विकास सायकल घोटाळा ससाने यांचा चौकशी अहवाल डावलून नवीन चौकशी समितीचा घाट....!


🌟जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन🌟


परभणी - जिल्हयातील मानव विकास योजने अंतर्गत २०२२-२३ मध्ये जिल्हयातील ८ हजार ६९ गोरगरीब विद्यार्थ्यांनीसाठी ४ कोटी ३ लाख ४५ हजार रुपये ऑगस्ट २०२२ मध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत सायकल वाटप करण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला होता. परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी सायकल योजनेपासून वंचित राहीले, व यात मोठया प्रमाणावर निधीचा अपहार व अनियमितता झाली. या तक्रारीवर ८ महिन्यापुर्वी तत्कालीन मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या आदेशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी शिक्षणाधिकारी (योजना) मा. श्री ससाने सर यांच्या अध्यक्षेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली याच चौकशी समितीचा अहवाल डावलून नवीन चौकशी समिती स्थापन करून दोषींना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषद प्रशसनान करीत आहे याबाबत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


माध्यमिक विभागातील अधिकारी व कर्मचारी चौकशीत सहकार्य करीत नसल्याने अनेक दिवसापासून चौकशी समितीचे काम थांबले होते. प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने पाठपुरावा करुन चौकशी सुरु करण्यात आली, परंतु चौकशी पूर्ण झाल्यानंतर श्री. ससाने समितीने मागील आठवड्यामध्ये संपूर्ण चौकशी करुन सादर केलेला अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी परत पाठवून या प्रकरणात नविन चौकशी समिती स्थापन करण्याची तयारी केली आहे. श्री. ससाने यांच्या सारख्या प्रमाणिक अधिकाऱ्याने पुर्ण केलेला चौकशी अहवाल न स्विकारता नव्याने चौकशी समिती स्थापन करण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असून या प्रकरणातील  जबाबदार तत्कालीन शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असून श्री. ससाने यांनी तयार केलेला चौकशी अहवाल तत्काळ स्वीकारून या चौकशी अहवालानुसार प्रकरणामध्ये दोषी आढळून येणाऱ्या जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासकिय रकमेचा अपहार व अनियमितता केल्या प्रकरणी गुन्हे करावेत असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड, रामेश्वर पुरी, शेख बशीर, बाळा नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या