🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात परिसरात स्वर्गीय सितारामजी आप्पा एकलारे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा...!


🌟शहीद भगतसिंग युथ ब्रिगेडच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟 

पू्र्णा :  जंक्शन, श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील महाविद्यालयाच्या समोर गार्डन मध्ये स्वर्गीय सीतारामजी आप्पा एकलारे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन संस्थेचे सचिव गोविंद कदम, कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजू एकलारे, प्राचार्य के राजकुमार, यांना भगतसिंग युद्ध ब्रिगेड पूर्णा यांच्या वतीने देण्यात आले.


या निवेदन मागील कारण की पूर्णा नगरीमध्ये शैक्षणिक ज्ञानगंगा आणणारे व पूर्णा तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, सामाजिक, राजकीय, व्यापारी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असे सिताराम आप्पा एकलारे हे पूर्णा शहरातील चांगले व्यक्ती होते. ते आज आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी सोडवले आहे व विविध योजना राबवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे विद्यार्थी, तरुण युवकांचे शैक्षणिक अडचणी दूर केल्या आहेत. त्यांचे कार्य देखण्या जोगे आहे म्हणून आपल्या मनात व स्मरणात राहतील.  त्या कारणामुळे श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय समोरील असलेल्या गार्डनमध्ये स्वर्गीय सीताराम आप्पा एकलारे यांचा पूर्णकृती  पुतळा उभारल्यास ते जिवंत आहेत असे वाटेल व त्यांनाही खरी श्रद्धांजली असेल. अशा प्रकारचे निवेदन शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड पूर्णा संस्थापक अध्यक्ष कुंदन ठाकूर, तसेच अविनाश नागरे अमोल पळसकर, आकाश सूर्यवंशी, हर्षद कापुरे ,यांनी केले आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या