🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील चालक-मालक संघटनेच्या वतीने 'हिट अँड रन' कायदा रद्द करण्याची मागणी....!


🌟ताडकळस पोलीस प्रशासनाला दिले निवेदन🌟

पुर्णा (दि.०३ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील संतकृपा चालक-मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने जो हिट अँड रन प्रकरणी कायदा पारित केला आहे.तो म्हणजे वाहनाचा अपघात झाल्यानंतर वाहन चालक जर अपघात झालेल्या व्यक्तीस घटनास्थळी सोडून गेल्यावर त्या चालकाला सात लाख रुपये दंड व दहा वर्ष सजा देणार असे त्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे पण दहा वर्षे सजा व सात लाख रुपये दंड यात सजेचा कालावधी पण खूप आहे व त्याचबरोबर सात लाखाचा दंड पण खूप आहे त्यामुळे वाहन चालकांसाठी ही एक मोठी शोकांतिका असून अपघात हा कोणताही वाहन चालक मुद्दामहून करत नाही व वाहनांचे अपघात हे नजरचुकीनेच होत असतात व अपघात झाल्यास त्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक हे त्या वाहनचालकाचीच चूक आहे असे भासवून स्वतः कायदा हातात घेतात व त्या वाहन चालकास बेदम मारहाण करत वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करतात अनेकदा तर वाहन चालकाचा जीव देखील उपस्थित नागरिक घेत असतात या बेदम मारहाणीच्या भीतीमुळे वाहन चालक घटनास्थळापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातातp त्यामुळे चालकास इतकी मोठी शिक्षा देणे हे अन्याय अन्यायकारक होत आहे असे देखील या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा रद्द करावा अशा आशयाचे निवेदन ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनी कपिल शेळके यांना दिले आहे.

यावेळी निवेदन देताना भगवान आंबोरे ,लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,नितीन भोसले ,बालाजी जाधव गजानन सोनटक्के ,पुरुषोत्तम पुरी आधी वाहन चालक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या