🌟लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - जिल्हाधिकारी


🌟इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे राष्ट्रीय मतदार दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.गावडे बोलत होते🌟


परभणी (दि.25 जानेवारी) : आगामी कालावधीत होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमिवर नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. 


येथील इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे राष्ट्रीय मतदार दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हां निवडणूक अधिकारी निवृत्तीच गायकवाड, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार संदीप राजपुरे, यांची उपस्थिती होती प्रत्येक नवमतदाराने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करणे हे प्रथम कर्तव्य मानून सहभागी व्हावे, असे आवाहन करुन समाजातील वंचित घटकांनाही या प्रक्रियेत सहभागी करुन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यावेळी म्हणाले. 


 भारतीय निवडणूक आयोग मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही एक उत्सव म्हणून साजरा करत आहे. देशातील एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. प्रत्येकाचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग असावा. यासाठी निवडणूक आयोग वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींची नाव नोंदणी करण्यासाठी कार्यरत आहे. तसेच विशेष मतदार नाव नोंदणी अभियानातून ऑफलाईन पद्धतीनेही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडेही फॉर्म भरता येतो असे सांगून युवा पिढीने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत काळानुरुप बदल आणि सुधारणा होत आहेत. हे करतांना निवडणूक विभागाला अत्यंत पारदर्शकपणे काम करावे लागते. देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भारत निवडणूक आयोग अविरतपणे कार्य करत असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.    

भविष्यात एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काम करत आहे. पुढील दशकभरात जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या मोठी राहणार असून, ही मोठी उपलब्धही असेल. या तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे विशेष मोहिम राबवित असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हाग निवडणूक अधिकारी निवृत्तीभ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताठविकातून मतदार दिनाचे महत्वा विशद करून जिल्ह्या च्याध मतदारांची आकडेवारीचे दाखले देत आगामी काळात होऊ घातलेल्या  निवडणुकीमध्येम सर्वांनी सहभाग घेऊन मतदान करण्याधचे आवाहन केले.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी विविध संदेशाचे फलक, मतदान जागृतीचे घोषणा देत शाळेपासून प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम पर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मतदार जनजागृतीपर गीत, पोवाडा, नाटीका, विद्यार्थिनींनी सादर केलेले पथनाट्य यांचा समावेश होता. पोखर्णी येथील नृसिंह माध्यफमिक व उच्चा माध्यीमि‍क विद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याेसाठी व दुरूस्तीिसाठीच्याि प्रक्रियेविषयी प्रबोधनपर उत्कृेष्ट् पथनाट्य सादर केले. भारतीय लोकशाही प्रणालीत मतदानाचे अनन्यस साधारण महत्व व निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सहभाग वाढविण्याकचा संदेश देणा-या उत्कृष्ट स्वीप कार्यक्रमाच्याे सादरीकरणाबद्दल यज्ञेश्वर लिंबेकर, शिवाजी कांबळे व अरविंद शहाणे यांना सन्मानित करण्यात आले. 

मतदार यादीच्यान पुनरिक्षण कार्यक्रमात महत्वा ची भुमिका बजावणा-या व उत्कृेष्टक काम केलेल्या  10 मतदान केंद्रस्तीरीय अधिकारी यांना त्यांवच्या  उत्कृवष्टा कामगिरीबद्दल जिल्हारधिकारी श्री. गावडे यांच्या हस्तेद प्रशस्तीयपत्र देऊन गौरविण्याीत आले. यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यामधून प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान केंद्रस्तवरीय अधिका-यांची निवड करण्याात आलेली होती नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या