🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून घेतला विविध उपक्रमांचा आढावा...!


🌟वैद्यकीय सहायता निधी,आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या🌟

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज सोमवार दि.०१ जानेवारी रोजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि  राज्यातील जनतेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी,आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याचा तसेच नाशिक येथे १२ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या