🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा....!


🌟यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟 

पूर्णा (दि.३० जानेवारी) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात हुतात्मा दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा डॉ प्रभाकर सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले.या याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या