🌟माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते स.जगदिपसिंघ नंबरदार यांची अजित न्युज हेडलाईन्स कार्यालयाला सदिच्छा भेट...!


🌟अजित न्युज हेडलाईन्सचे व शहिद स.उधमसिंघ फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला त्यांचा सन्मान🌟 


परभणी/पुर्णा : नांदेड येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदिपसिंघ नंबरदार यांनी आज गुरुवार दि.११ जानेवारी २०२४ रोजी १२-०० वाजेच्या सुमारास पुर्णा येथील जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासह नगरसेवक ॲड.राजेश भालेराव यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील धाडसी नेतृत्व तथा शिवसेना युवासेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष तथा जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स या वेबवृत्त वाहिनीचे संपादक संचालक चौधरी दिनेश यांच्या वतीने माणिकराव सुर्यवंशी व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते स.जगदिपसिंघ नंबरदार यांना अतिथी सन्मानचिन्ह व शिरोपाव देऊन सन्मानित करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या