🌟नांदेड येथील अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट : पंजाब पोलीसचा विराट विजय....!


🌟अमृतसर,अमरावती,कोलकाता संघ विजयी🌟

नांदेड (दि.12 जानेवारी) :  येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी पंजाब पोलीस संघाने चार साहेबजादा अकाडेमी नांदेड संघाचा दहा विरुद्ध शून्य गोल अंतराने मोठा पराभव केला. तर इतर सामन्यामध्ये एसजीपीसी अमृतसर, इलेवन स्टार अमरावती, हावडा डिवीजन कोलकाता संघानी आपले सामने सहज जिंकले.


आज सकाळी पहिला साखळी सामना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर आणि साईं एक्सेलेंसी औरंगाबाद संघादरम्यान खेलविण्यात आला. अमृतसर संघाने 3 विरुद्ध 1 गोल फरकाने औरंगाबाद संघाला मात दिली. अमृतसर संघाचे जगजीतसिंघ ने खेळाच्या 12 व्या मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी मिळवली. त्यानंतर गुरतेजसिंघ याने 50 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल साधला. प्रमोदसिंघने खेळाच्या शेवटच्या क्षणी गोल करत विजयाकडे नेले. दूसरीकडे औरंगाबाद तर्फे मोहित ने 54 मिनिटाला मैदानी गोल केले.


दूसरा साखळी सामना इलेवन स्टार अमरावती आणि इटावा हॉस्टल सैफई (उप्र) संघादरम्यान खेळला गेला. अमरावती संघाने इटावा संघास 3 विरुद्ध 1 गोलाने नमवले. अमरावतीच्या विवेक मोरगे खेळाडूने खेळाच्या 7 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करून आघाडी मिळवली. त्यानंतर 20 व्या मिनिटाला जावेद खान याने गोल करत आघाडी पुढे नेली. इटावा संघाने रोमित पाल याच्या गोलाने 26 व्या मिनिटाला खेळात परतण्याचा प्रयन्त केला. मात्र अमरावती संघाने पुन्हा 37 व्या मिनिटाला गोल करत खेळ एकतर्फा नेला. तीसरा गोल उमेर अब्दुल याने केला.

आज तीसरा साखळी सामना हावडा डिवीजन कोलकाता संघा दरम्यान खेळला गेला. कोलकाता संघाने 4 विरुद्ध 2 गोल अंतराने खिश्यात घातला. खेळाच्या सुरुवातीला तिसऱ्या मिनिटालाच मुंबई संघाने पहिला गोल करत आघाडी घेतली. इक्तिदार इशरत ने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल केला. कोलकाता संघाच्या अमोल टरकीने खेळाच्य 11 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर विकास लाकराने 19 व्या आणि आलसेम लाकराने 25 व्या मिनिटाला गोल केले. उत्तरात मुंबई संघाच्या अमीद खान पठान याने 44 मिनिटाला गोल केले. खेळाच्या 55 व्या मिनिटाला शिवम सिंघ याने गोल करून आघाडीचा अंतर वाढवला.

आजचा चौथा सामना पंजाब पोलीस संघाने एकतर्फा जिंकला. पंजाब पोलीस संघाने नांदेडच्या चार साहबजादा अकाडेमी संघाचा 10 विरुद्ध शून्य गोल अंतराने पराभव केला. कर्णधार करणबीरसिंघ याने दोन गोल केले. तर जगमीतसिंघ, पवनदीपसिंघ आणि वरिंदर सिंघ यांनी प्रत्येकी दोन गोल केले. बलविंदरसिंघ आणि सरबजीतसिंघ यांनी एक - एक गोल केले.आजचा पाचवा सामना खालसा यूथ क्लब नांदेड आणि दिल्ली यूनिवर्सिटी संघा दरम्यान अनिर्णीत ठरला. दोन्ही संघाकडून एक - एक गोल करण्यात आला.....

स.रविंद्रसिंघ मोदी - नांदेड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या