🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद....!


🌟मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीकडून 6,22,000/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत🌟

फुलचंद भगत

वाशिम :- मंगरुळपीर पोलिस विभागाने मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद केली असुन त्यांचेकडुन ६,२२००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

             सविस्तर वृत्त असे की,आरोपी 1) रमजान निजाम परसुवाले वय 26 वर्ष रा लावणा ता. मंगरुळपीर जि. वाशिम 2) विशाल अरवींद चव्हान वय 28 वर्ष रा. जोगलदरी ता. मंगरुळपीर जि. वाशिम 3) सतीष नारायण चौधरी वय 40 वर्ष रा. लावणा ता. मंगरुळपीर जि. वाशिम यांना मोटारसायकल चोरी प्रकरणात पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.पोलीस स्टेशन मंगरुळपीर हददीत मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरीता मा. उपविभागिय पोलीस अधीकारी तसेच मा. पोनि सा यांनी सुचना निर्गमीत करुन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पोस्टे मंगरुळपीर येथे दिनांक 28/12/2023 रोजी अप क्र 918/2023 कलम 379 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/53 दिगांबर राठोड करीत आहे.

                 पोस्टे मंगरुळपीर येथून वरील नमुद गुन्ह्यात चोरी गेलेली मोटारसायकल तसेच यापुर्वी पोस्टे हद्दीमधून चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा समांतर तपास करून शोध घेत असतांना व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन आरोपीची शरीरयष्टी व गुन्हा करण्याची पध्दती अभ्यासून सदर आरोपीबाबत डी बी पथक येथील पोहेकों अमोल मुंदे, पोकों मोहमंद परसुवाले यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, सीसीटीव्ही मधील शरीरयष्टी असेलला

इसम हा ग्राम लावणा येथील रमजान निजाम परसुवाले हा असून त्यानेच सदर मोटारसायकलची चोरी केली आहे. अशा माहीतीवरुन पोस्टे मंगरुळपीर येथील डी बी पथक यांना ग्राम लावणा येथे रवाना केले आणि सदर इसम याची गोपनीय माहीती काढून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता वरील अपराध क्र 918/23 मधील मोसा त्यांनी त्याचे साथीदार सतिष नारायण चौधरी रा लावणा आणि विशाल अरवींद चव्हाण रा जोगलदरी यांचेसोबत मिळून केल्याचे सांगून सदर मोसा त्याचे घरीच ठेवल्याचे सांगितल्याने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या आवारात दोन मोटार सायकली मिळून आल्या. आरोपी याने सदर दोन मोसा पैकी एक मोसा वरील गुन्ह्यातील असल्याचे सांगितले आणि दुसरी मोसा ही सुध्दा चोरी करुन आणल्याचे सांगितले. तसेच त्याचे वरील दोन साथीदार यांचेकडे सुध्दा चोरी केलेल्या मोसा असल्याचे सांगितले. वरुन आरोपी रमजान परसुवाले याचे साथीदार सतिश नारायण चौधरी आणि विशाल अरविंद चव्हाण यांना सुध्दा ताब्यात घेवून त्यांना विश्वासात

घेवून विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे अप क्र 918/23 मधील मोसा चोरी केल्याचे सांगितले परंतु पोस्टे हद्दीतील उर्वरीत चोरी गेलेल्या वाहणाबाबत विचारपूस केली असता प्रथम उडवाउडवीचे उतरे दिल्याने त्यांना पुन्हा विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे हद्दीतील तसेच इतर पोस्टे हद्दीमधून चोरी केलेल्या मोसा लपवून ठेवल्या बाबत सांगितल्याने आरोपी सतिश नारायण चौधरी वय 40 वर्ष रा लावणा ता मंगरुळपीर यांचे कडून पाच मोटार सायकली तसेच आरोपी विशाल अरविंद चव्हाण याचेकडून चार मोटार

सायकली अशा एकूण 11 मोटार सायकल एकूण किंमत 6,22,000/रुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीतांनी पोस्टे हद्दीतील तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक मोटार सायकली चोरी केल्या असून त्याबाबत अधिक विचारपूस सुरु आहे.सदरची कार्यवाही मा. अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम, मा. भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम, मा. निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, सपोनि निलेश शेंबळे पोस्टे मंगरुळपीर यांच्या नेतृत्वात, डी बी पथक येथे कार्यरत पोउपनि दिनकर राठोड, पोहेकॉ अमोल मुंदे, पोकॉ मोहमंद परसुवाले, पोकॉ अमोल वानखडे, पोकॉ सुमीत चव्हाण, पोना सुनिल गंडाईत यांनी केली.......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या