🌟पेशवाई रोकण्यासाठी संविधानाच्या पाठीशी उभे रहा - प्रकाश कांबळे


🌟 पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगांव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मानवंदना सभेत ते बोलत होते🌟 


पुर्णा (दि.०१ जानेवारी) : भीमा कोरेगांव येथे ०१ जाने.१८१८ रोजी झालेल्या युद्धात महार आणि बहुजन समाजातील सैनिकांनी दुसरा बाजीराव पेशवा यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांचा पराभव करून पेशवाईला मूठमाती दिली.आज पुन्हा चोर मार्गाने देशात पेशवाई येण्याची चाहूल लागत आहे.ही पेशवाई रोकण्याचे सामर्थ्य केवळ भारतीय संविधानात असल्याने देशातील प्रत्येक वंचित घटकाने व संविधांनिष्ठ नागरिकांनी संविधानाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.असे विचार सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी पूर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बि.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पुर्णाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे  म्हणून बोलत होते .                          

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृतराव मोरे हे होते प्रारंभी आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त जी महास्थविर,प्रकाश कांबळे,उत्तम खंदारे,डॉ.मोहनराव मोरे,अनिल खर्गखराटे,अशोक धबाले,आदि मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ.मोरे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते भीमा कोरेगांव विजयी स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली.सभेच्या प्रारंभी उपस्थित जनसमुदायास पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महस्थविर यांनी त्रिसरण पंचशील दिले.

 याप्रसंगी त्यांनी आपल्या प्रवचनात भीमा कोरेगावची लढाई ही अन्याय अत्याचाराविरुद्ध व मानवी मुल्यांसाठी होती.या लढाईने माणुसकीची शिकवण दिली.माणसामाणसातील भेद नष्ट करण्याचा संदेश दिला.भीमा कोरेगांवच्या लढाईने अस्पृश्य समाजासाठी हक्क आणि स्वाभिमान दिला,त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे केले.तेंव्हा सर्वांनी प्रेमाने राहावे आणि माणुसकीने वागावे.कुणाचाही द्वेष करू नये असे प्रतिपादन केले या सभेचे प्रास्ताविक ॲड.हर्षवर्धन गायकवाड यांनी केले.तर या प्रसंगी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे,नगर परिषदेचे गट नेते उत्तम खंदारे,वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित यांनी भीमा कोरेगांव येथे महार सैनिकांनी केलेल्या शौर्याचा गौरव केला.

यावेळी बोलतांना कांबळे पुढे म्हणाले,' भीमा कोरेगांव येथील लढाई ही महार आणि बहुजन समाजातील सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढून पेशवाई नष्ट केली.त्यामुळे महार आणि बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण,नोकरी, आणि स्वाभिमान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला.आज स्वातंत्र्याच्या पचंहात्तर वर्षानंतर पुन्हा 

बौद्ध आणि बहुजन समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक आणि नोकरी विषयक योजनांवर गंडांतर आणून राज्यातील आणि केंद्रातील सरकार अडथळे निर्माण करून पुन्हा चोर वाटेने पेशवाई आणण्याचे कट कारस्थान करीत आहे. या भारतीय संविधानाचे येथील सर्वसामान्यांच्या हक्काचे रक्षण करीत त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करून या देशाला एकसंघ ठेवून देशाचा विकास केला.हे मनुस्मृती जोपासणाऱ्या विषमतावादी लोकांना आवडत नाही सामान्य लोक इतरांच्या बरोबरीने बसत असल्याचे त्यांना खुपते.म्हणून त्यांना डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलायचे आहे. याला सर्व बौद्ध,बहुजन समाजाच्या लोकांनी संघटितपणे एकत्र येवून हा मनुस्मृती वाल्यांचा डाव ओळखला पाहिजे.संविधानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.असेही प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी भदंत पंय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगांव युद्धात शौर्य दाखविणाऱ्या शुर सैनिकांना अभिवादन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम येंगडे,श्यामराव जोगदंड,डॉ.गंगाधर कांबळे,डॉ.संदीप जोंधळे,डॉ.थोरात, प्रा.धममा जोंधळे,त्रिंबक कांबळे,मोहन लोखंडे, ॲड.जोंधळे,प्रवीण कंनकुटे,मुंजाजी गायकवाड,विजय जोंधळे,अशोक धबाले,वामनराव काळे,शाहीर गौतम कांबळे,मुगजी खंदारे,बाबाराव वाघमारे,प्राचार्य केशव जोंधळे,अनिल अहिरे,प्रदीप ननावरे, कैलाश बलखंडे,धनराज दुशिंगे,आदि सह शहरातील सर्व महिला मंडळांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध गायक विजय सातोरे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या