🌟मत्स्य व्यवसाय तांत्रिक विभागाच्या वतीने मच्छीमारांची क्रियाशीलता तपासणी.....!


🌟यामध्ये नोंदणी कृत संस्थेचा सभासद हा प्रत्येक्ष मासेमारी करणारा सक्रीय मच्छीमार असला पाहिजे🌟


     महाराष्ट्र राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छीमार सभासदांची मत्स्य व्यवसाय विभागाकडून महाराष्ट्रातील नोंदणी कृत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या क्रियाशील सभासदांची क्रियाशीलता तपासणी चालू करण्यात आली आहे.यामध्ये नोंदणी कृत संस्थेचा सभासद हा प्रत्येक्ष मासेमारी करणारा सक्रीय मच्छीमार असला पाहिजे.

              आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई व मा.सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय परभणी मा श्री. प्र.दा..जगताप यांच्या निदर्शनानुसार मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी परभणी श्री दत्तात्रय लटपटे साहेब यांनी दिनांक 19-1-2024 रोजी गोदावरी मागासवर्गीय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित दुसलगांव ता गंगाखेड जिल्हा परभणी या संस्थेचे मन्नाथ तलावावर श्रीफळ फोडून व रिबीन कापून क्रियाशीलता तपासणी चे उदघाटन केले.

संस्था नोंदणी पश्चात झालेल्या सभासदांची क्रियाशीलता तांत्रिक तपासणी मुख्य कार्यालयाच्या नियम व अटी च्या निदर्शनासुर घेण्यात आली यावेळी क्रियाशील सभासदांनी मासेमारी साठी लागणारे सर्व साहित्य घेऊन क्रियाशीलता तपासणी 31 सभासद नी दिली ही संस्था 1996 स्थापन झाली असून अनेक सभासदांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. अनेक सभासद सरकारी सेवेत रुजू झाले आहे. या वेळी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री. दत्तात्रय लटपटे साहेब यांनी क्रियाशीलता तांत्रिक तपासणी पास झालेल्या सर्व मच्छीमार सभासदचे कौतुक केले. व सभासदांच्या वतीने साहेबांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल भुंगासे सचिव सौ. यशोदा गहिरे पोलिस पाटील दुसलगांव सौ. संगिता कचरे ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश कचरे संचालक सौ मुक्ताबाई बिजले संचालक सौ जनाबाई भुगासे संचालक सौ लताबाई कचरे संचालक श्री कृष्णा बिजले संचालक श्री पवन कचरे व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या