🌟परभणी शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर नो स्टॉकचे बोर्ड...‌‌.!


🌟हिट अ‍ॅण्ड रन कायद्या विरोधात ट्रान्सपोर्ट धारकांचा संप : टँकर जागच्या जागी : जनजीवन विस्कळीत🌟

परभणी (दि.०२ जानेवारी) : केंद्रातील मोदी सरकारने हिट अ‍ॅण्ड रन कायद्यात सुधारणा करीत वाहन अपघात प्रकरणात ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करीत  नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा ०२ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद केल्याच्या निषेधार्थ ट्रान्सपोर्ट धारकांसह चालकांनी आज मंगळवार दि.०२ जानेवारी रोजी सुरु केलेल्या बेमुदत संपाचे तिव्र पडसाद पहिल्याच दिवशी शहरासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात उमटले अन् पहाटेपासून पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत बहुतांशी पेट्रोल पंपांवरील इंधनाचा साठा संपुष्टात आला, त्यामुळे पंपधारकांनी नो स्टॉकचे बोर्ड झळकवले.

             वसमत रस्त्यावरील अमोल पेट्रोलपंप, मध्यवस्तीतील भिकुलाल पेट्रोलपंप, पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस पंपांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नो स्टॉकचे बोर्ड झळकले तर जिल्हा परिषद इमारतीसमोरील दुर्राणी पेट्रोलपंप, वसमत रस्त्यावरील आर.आर. पेट्रोल पंप, फड यांचा पेट्रोल पंप तसेच भरोसे पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. गंगाखेड रस्ता, पाथरी, रस्ता तसेच जिंतूर रस्त्यावरील लांबपर्यंतच्या पेट्रोलपंपांवरही वाहनधारकांची गर्दी उसळली होती.

            दरम्यान, वाहनधारकांनी दोन, तीन दिवस इंधन पुरवठा सुरळीत होणार नाही, हे ओळखून टँक फुल करण्याचे प्रकार सुरु केले होते. त्यामुळेच या पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड झळकले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या