🌟परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांचा जनहीवादी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मानचिन्ह देऊन सर्वोच्च सन्मान...!


🌟पोलिस अधिक्षक कार्यालयात शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन व शिख समाजाच्या वतीने करण्यात आला सन्मान🌟


परभणी/पुर्णा :  शहीद सरदार उधमसिंह फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने दि.०६ जानेवारी २०२४ रोजी शहरातील नगर परिषद प्रशासकीय इमारतीतील सभागृहात दर्पण दिनाचे औचित्य साधून सामाजिक/शैक्षणिक/उद्योग व्यापार/राजकीय/प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृतवान व्यक्तीमत्वांसह सामाजिक बांधिलकी जोपासत विकासात्मक वाटचालीत आपली लेखणी झिजवत पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर.(IPS) यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते परंतु प्रशासकीय कामांच्या व्याप्तीमुळे सन्माननीय जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.या येवू शकल्या नाही त्यामुळे आयोजकांसह कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील 'समाज भुषण' श्री जनार्धन आवरगंड यांच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून काल बुधवार दि.१० जानेवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत'जनहीवादी कर्तव्यदक्ष अधिकारी' हा सन्मान स्विकार करीत शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रचे आभार व्यक्त केले.

यावेळी पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मौ.उखळद मौजे उखळत येथे २७ मे २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवर पाळीव वराह शोधण्यासाठी निघालेल्या अल्पसंख्यांक शिख सिखलकरी समाजातील तीन अल्पवयीन मुलांना गावातील काही गावकऱ्यांनी चोर समजून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अमानुषपणे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत यातील एका चौदा वर्षीय बालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेची देखील सन्माननीय जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांनी गांभिर्याने दखल घेऊन सहा अरोपी जेरबंद करीत त्या पिडीत कुटुंबांना न्याय दिल्याने त्यांचा नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिख समाजाच्या वतीने गुरुद्वारा बोर्डाचे मा.सदस्य तथा जेष्ठ समाजसेवी सरदार जसपालसिंघ लांगरी व बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या हस्ते पवित्र तिर्थक्षेत्र सचखंड गुरुद्वारा येथील शाल शिरोपाव प्रसाद व 'सचखंड पत्र' देऊन त्यांचा सर्वोच्च सन्मान करण्यात आला.


यावेळी संपादक धम्मपाल हानवते संपादीत दैनिक क्रातिशस्त्र या वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे देखील सन्माननीय जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी शहीद उधमसिंह फाउंडेशन महाराष्ट्रचे चौधरी दिनेश (रणजीत) या.नगरसेवक ॲड.राजेश भालेराव यांच्यासह गुरुद्वारा बोर्ड नांदेड चे सन्माननीय मा.सरदार जसपालसिंघ लांगरी,बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,सरदार जगजितसिंघ खालसा,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते भास्कर गोंधवे,दैनिक क्रांतीशस्त्र चे संपादक धम्मपाल हानवते,पूर्णा तालुका उपाध्यक्ष शिवाजी शिराळे ,ताडकळस मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,दैनिक सामनाचे जनार्दन आवरगंड ,दैनिक सोमेश्वरसाथी चे सचिन सोनकांबळे,यांच्यासह आदींची उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या