🌟परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟उद्या बुधवार दि.३१ जानेवारी रोजी पालकमंत्री संजय बनसोडे परभणी जिल्हा दौऱ्यावर🌟

परभणी (दि. ३० जानेवारी) : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे उद्या बुधवार दि.३१ जानेवारी रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्री. बनसोडे यांचे हेलिकॉप्टरने  दुपारी १२.३० वाजता बळीराजा साखर कारखाना, कानडखेडा ता. पूर्णा येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता अजिंठा कमानीचे उद्घाटन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रु. १ कोटी निधी मधून बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा. बौद्ध धम्म परिषद उद्घाटन, स्थळ : बुद्ध विहार, उपाली थेरो नगर, ता. पूर्णा. दुपारी ३.०० वाजता बळीराजा साखर कारखाना, कानडखेड ता. पूर्णा येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील...... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या