🌟मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा नव्या पिढीसमोर प्रेरणादायी व स्फूर्तीदायक....!


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य सचिव प्रा.डॉ.प्रदीप आगलावे यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.१५ जानेवारी) - पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात काल शनिवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उत्तमभैया खंदारे यांच्या मुख्य संयोजनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन सोहळा व जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत.पैय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या नामविस्तार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोलातूर येथील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ सुरेश वाघमारे यांची आवर्जून उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून येथील सुप्रसिद्ध युवा उद्योजक रवी वाघमारे हे होते.


तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष  नगरपालिकेचे गटनेते उत्तंमभय्या खंदारे यांच्या मुख्य संयोजनाखाली झालेल्या या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन सोहळा व जाहीर अभिवादन सभेच्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते व सत्कारमूर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य सचिव सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ.प्रदीप आगलावे नागपूर आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये म्हणाले भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून जवळपास दोन दशक प्रदीर्घ लढा उभा राहिला या प्रेरणादायी स्फूर्तीदायक लढ्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही .


एका जागतिक दर्जाच्या विद्वानाचं नाव ज्यांचं आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान होते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ज्यांनी या देशाला समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व दिलं मराठवाड्या सारख्या शैक्षणिक मागास भागामध्ये संभाजीनगर या ठिकाणी सन १९५० च्या दशकामध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.मराठवाड्याचा व महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यामध्ये या महाविद्यालयाचे मोठं योगदान राहिलेल आहे.


नामांतराच्या लढ्यामध्ये अनेक योध्द्यांनी आपल्या घरा दाराची संसाराची पर्वा न करता नामांतर लढ्यामध्ये स्वतःला वाहून घेतले.कित्येक जण शहीद झाले.नामांतराचा लढा हा सामाजिक समतेचा आंबेडकरी व परिवर्तनवादी जनतेचा अस्मितेचा लढा  होता जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली.एकेकाळी हा देश बौद्ध धर्मीय होता.प्राचीन काळातील मंदिर लेण्या गुफा याची साक्ष देतात. बुद्ध धम्माची प्रतिके त्या ठिकाणी दिसतात. महामानव तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला मानवतावाद अंगीकारल्यास जगामध्ये भारताची एक वेगळी ओळख निर्माण होईल असेही याप्रसंगी बोलताना ते म्हणाले.


अध्यक्षीय समारोपपर भाषण करतांना लातूर येथील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत ज्यांनी नामांतर आंदोलनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतला होता असे प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे यांनी नामांतर आंदोलनाचा इतिहास विशद केला जनार्दन मवाडे पोचिराम कांबळे गौतम वाघमारे सुहासिनी बनसोडे प्रतिभा तायडे रोशन बोरकर आदी नामांतरामध्ये शहीद झालेल्या नामांतर लढ्यातील शहिदांच्या त्यागमय जिवण कार्याचा इतिहास विशद केला.

" मारलो गेलो तरी नाही सोडले तुला

तोडले गेलो तरी नाही सोडले तुला

घे भिमराया तुला उध्वस्त घराची वंदना "

घराची राख रांगोळी होत असताना फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव विद्यापीठाला मिळाव म्हणून  ज्यांनी मृत्यूला कवटाळले.त्या शहिदाचा स्मरण अभिवादन सभेच्या माध्यमातून तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया खंदारे गेल्या 21 वर्षापासून करत आहे. त्यांचा हा उपक्रम समाजाला जागृत करणारा आहे.विद्यार्थी विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षण घेतलं पाहिजे हेच खरे त्यांच्या विचाराला कार्याला अभिवादन आहे.

या अभिवादन सभेमध्ये भारतीय दलित पँथर ज्येष्ठ कार्यकर्ते नांदेड येथील दैनिक रिपब्लिकन गार्डचे संपादक समाजभूषण विजय सोनवणे यांना तथागत मित्र मंडळाचा सन्मानाचा पॅंथर रत्न पुरस्कार व सन्मानपत्र त्याचप्रमाणे पूर्णा येथील ज्येष्ठ निर्भिड निःपक्षपाती पत्रकार अजित न्यूजचे संपादक दिनेश चौधरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


यावेळी मानपत्राचे वाचन प्राध्यापक धम्मा वाईवळ कृषी अधिकारी अनुरथ पुंडगे सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक रौफ कुरेशी यांनी केले अभिवादन सभे अगोदर औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामधील प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर इंगोले जय भीम बुद्ध गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता पॅंथर चळवळीतील अग्रणी सुप्रसिद्ध विचारवंत प्रकाश कांबळे माजी नगर सेवक अशोक धबाले यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.भदंत पय्यावांश यांनी त्रिशरण पंचशील दिले.


यावेळी प्रमुख उपस्थिता मध्ये प्राचार्य मोहनराव मोरे सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव राजभोज पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, वसमत चे नगरसेवक राजकुमार येंगडे माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी प्राचार्य राम धबाले प्राध्यापक अशोक कांबळे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे जेष्ट समाजसेवक देवराव खंदारे नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे दादाराव पंडित अनिल खरगखरा टे सुनील कांबळे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात तथागत मित्र मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रम व स्पर्धा यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध खंदारे यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्र मंडळाचे मनोज खिल्लारे शिवा हातागळेप्रवीण कनकुटे विशाल भुजबळ धम्मा खंदारे गौतम गायकवाड मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले........

***************"****************"*************

🌟अत्यंत निर्मळ हृदयी व्यक्तीमत्व....नावाप्रमाणेच उत्तम कर्तृत्व अन् तमाम बहुजनांचे धाडसी नेतृत्व सन्माननीय उत्तमभैया खंदारे


" अत्यंत निर्मळ हृदयी व्यक्तीमत्व आपल्या नावाप्रमाणेच उत्तम कर्तृत्व अन् तमाम बहुजनांचे धाडसी नेतृत्व " माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय उत्तमभैया खंदारे यांना एक छोटीशी भेट देऊन सन्मानित करतांना आदर्श सेवा निवृत्तशिक्षक जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर, शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,शिवसेना युवासेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,दैनिक गावकरी पत्रकार सय्यद सलीम सुहागणकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या