🌟परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला : शिवसैनिकांनी स्वतःचे रक्त सांडून जिल्ह्यात शिवसेनारुपी वटवृक्ष उभा केला....!


🌟दुर्दैव संधीसाधूंनी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी शिवसेनेसह शिवसैनिकांचे दमन केले - संघर्ष योध्दा देवा पाटील 


मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील हिंदू हृदयसम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित झालेला शिवसेनेचा ढाण्या वाघ संघर्ष योद्धा देवा पाटील यांनी जिल्ह्यातील शिवसेने संदर्भात बोलतांना असे नमूद केले की परभणी जिल्हा म्हणजे शिवसेनेचा अस्सल बालेकिल्ला जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वतःचे रक्त सांडून या जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष उभा केला. 


जिल्ह्यातील सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकांच्या त्या त्यागासमोर आज जे स्वतःला फार मोठ समजत आहेत पाण्यावरील बुडबुडे आहेत जोपर्यंत या परभणी जिल्ह्यात शिवसैनिक व शिवसैनिकांची पक्षनिष्ठा जिवंत आहे तोपर्यंत पक्षाने तिकीट दिलेल्या गाढवांना देखील पक्षादेश मानून निवडून आणण्याची ताकत शिवसैनिकांमध्ये आहे ज्या पक्षनिष्ठ तत्वनिष्ठ शिवसैनिकांमुळे तुम्हाला नगरसेवक आमदार खासदार मंत्रीपदं भेटली त्या शिवसैनिकांच्या आयुष्याची यांनी राखरांगोळी केली जिल्ह्यातील निस्वार्थी कडवट,निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षासाठी आपलं आयुष्य सर्वस्वीपणे वाहून टाकलं "शिवसेना" या चार अक्षरांसाठी म्हणून आज त्याच शिवसैनिकांच्या आजपर्यंतच्या या त्यागाचा आणि सांडलेल्या रक्ताचा एकप्रकारे वापर करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम काहींनी स्वार्थासाठी केलं आहे पण शिवसैनिक हा संघटनेचा सर्वात मोठा आधार आहे तो या गलिच्छ राजकारणाचं उत्तर येत्या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे याद राखा कितीही गद्दारी झाली तरी जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना अजरामर अमर आहे या निस्वार्थी शिवसैनिकांच्या जोरावरच परभणी जिल्हा मागील तिन/साडेतीन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठामपणे उभा आहे शिवसेनेला परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांमुळेच निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह बहाल केले होते आता पुन्हा एकदा तिच वेळ आली आहे असेही संघर्ष योद्धा देवा पाटील म्हणाले...............

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या