🌟पुर्णेत २१ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन : पालकमंत्री संजय बनसोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती.....!


🌟परिषदेचे अध्यक्ष म्हणून भिक्खू करुणानंद महाथेरो दिल्ली यांची उपस्थिती🌟 


बोधिसत्व डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित, २१ वी “बौद्ध धम्म परिषद व स्मृतीशेष भदन्त उपाली थेरो” यांच्या ४१ व्या स्मृतिदिनाचे आयोजन माझ्या कार्यक्षेत्रातील मौजे पूर्णा येथे आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्री क्रीडा, युवक कल्याण व बंदरे तथा पालकमंत्री परभणी मा.ना. श्री संजयजी बनसोडे साहेब उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष म्हणून भिक्खू  करुणानंद महाथेरो दिल्ली, उद्घाटक धम्मा मास्टर डॉ. ली ची व्हॉइस चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ तसेच ध्वजारोहक धम्मा मास्टर डॉ. हाँग जीन सू होम दक्षिण कोरिया उपस्थित होते. या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भन्ते डॉ. उपगुप्त महाथेरो हे होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून जनसमुदायशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले.

         या धम्म परिषदेस परभणी जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्री राजेश दादा विटेकर, जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावंडे, पोलीस अधीक्षक आर. रागसुधा, गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराजजी दापकर,जिल्हा परिषद माजी सदस्य किशनराव भोसले, परभणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रल्हादराव मुरकुटे, तालुकाध्यक्ष श्री गणेशराव कदम, पालम तालुका प्रभारी श्री माधवराव गायकवाड, तालुका प्रभारी श्री सुभाषराव देसाई यांच्यासह, राष्ट्रीय समाज पक्ष व माझ्या मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भारतभरातून आलेले भिक्खू, उपासक,उपसिका, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या