🌟परभणी जिल्हा लाल बावटा वाहन चालक-मालक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने....!


🌟शासनाने लागू केलेल्या नवीन हिट अ‍ॅन्ड रन कायद्यास विरोध🌟

परभणी (दि.०२ जानेवारी) : परभणी जिल्हा लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मंगळवारी दि.०२ जानेवारी रोजी सकाळी १२-०० वाजता स्टेअरिंग छोडो आंदोलन करीत जोरदार निदर्शने करण्यात आली.

               वहीद खान, सय्यद अझहर, संदीप सोळंके, सोएब बेग, इरफान खान, सोमनाथ चव्हाण, युनुस शेख, मोहम्मद मुनव्वर, शेख जहीर, शफी राम नगर, शेख रशीद, जबी खान, शेख जावेद, सिराज खान, शेख शब्बीर, यांच्यासह अन्य वाहन चालक व मालक या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होते.

या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर केले. त्याद्वारे १० वर्षे शिक्षा व ०७ लाख रूपये दंडाची तरतुद रद्द करावी, इन्शुरन्सच्या नावाने लुट बंद करावी, वाहन कर, दंड, चेक पोस्ट याद्वारे लुट बंद करावी, आरटीओ विभागातील भ्रष्टाचार बंद करावा, टोल नाकेबंद करावा, चालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करून प्राव्हिडंट फंड, पेन्शन लागू करावी, ड्रायव्हरला सौजन्य पुर्ण वागणुकीची हमी द्यावी आदी मागण्या केल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या