💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस स्थानकात कार्यरत पिएसआय प्रभाकर गवारे यांचा भिषण अपघातात दुर्दैवी मृत्यू....!


💥भिषण अपघातात स्कार्पिओ जागीच जळून खाक : अपघातानंतर स्कार्पिओ चालक झाला फरार💥 

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे आपले कर्तव्य बजावून काल शनिवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या मोटरसायकल वरुन सोनपेठ येथून मानवतकडे निघाले असतांना भारसवाडा लगत पोखर्णी ते पाथरी रोडवर समोरुन येणाऱ्या स्कार्पिओ व मोटरसायकल मध्ये झालेल्या भिषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात स्कार्पिओ संपूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली या भयंकर अपघातानंतर स्कार्पिओ चालक पसार झाल्याने या घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


सोनपेठ पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचे घर मानवत येथील पोलिस वसाहतीत असल्यामुळे ते सोनपेठ पोलीस स्थानकात कर्तव्य बजावण्यासाठी पोखर्णी मार्गाने मानवत येथून आपल्या मोटरसायकल येणे जाणे करीत असत नेहमी प्रमाणे गवारे हे सायंकाळच्या सुमारास मानवतकडे निघाले असतांना समोरुन येणाऱ्या स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच.२२ एम एल ४७५० या गाडीत व त्यांच्या मोटरसायकल जोरदार धडक झाल्याने त्यांचा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर या भयंकर अपघातानंतर स्कार्पिओने देखील पेट घेतल्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली या घटनेनंतर स्कार्पिओ चालक घटनास्थळावरून पसार झाला यावेळी गाडीतील प्रवासी देखील घटनास्थळावरून निघून गेले घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर.बंदखडके,फौजदार मुंडे, पोलीस कर्मचारी कुकडे,रसाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन घटनास्थळ पंचणामा करीत अपघातात मृत्यू पावलेल्या गवारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवल्याचे समजते दरम्यान ऐन संक्रांत सनाच्या पुर्वसंध्येला एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याचा अपघातात अकाली मृत्यू झाल्याने सोनपेठ/मानवत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे........टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या