🌟पुर्णा शहरातील चहा शौकीनांना उत्कृष्ट चहाचा स्वाद देण्यासाठी आता 'कार्यसम्राट चायबार' मैदानात....!


🌟शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात 'कार्यसम्राट चाय बारचे' मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन🌟 


पुर्णा शहरातील चहा शौकीनांना उत्कृष्ट चहाचा स्वाद देण्यासाठी आता 'कार्यसम्राट चायबार' देखील मैदानात उतरला असून येथील होतकरू तरुण सामाजिक कार्यकर्ते कुंदन ठाकूर (राणा) यांच्या  'कार्यसम्राट चायबारचे' आज ०१ जानेवारी २०२४ रोजी नववर्षाच्या मुहूर्तावर श्री गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजू अण्णा एकलारे ग्रामीण भागातील आंबेडकरी चळवळीतील धाडसी युवा उद्योजक संदिप भैय्या ढगे, प्राध्यापक गोविंद कदम यांच्या शुभहस्ते व ॲड.अमोल पळसकर,ॲड. अजय गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे आदींच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी 'कार्यसम्राट चायबार' उद्घाटन प्रसंगी त्यांना जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जगदीश जोगदंड सर, दैनिक एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड,धनगर टाकळीचे सरपंच सैनाजी माटे,आजदापूरचे सरपंच लक्ष्मण वैद्य,परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत आवरगंड, धनगर टाकळी येथील शिवसेना (उबाठा) शाखा प्रमुख मुंजाजी कोमटवार यांनी 'कार्यसम्राट चायबारचे' मालक कुंदन ठाकूर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.....
  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या