🌟परभणीत दुसऱ्या दिवशीही बाल महोत्सवास स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,बुद्धिबळ,कॅरम, वकृत्व,एकलगायन निबंध या स्पर्धेचे आयोजन🌟 


परभणी (दि.30 जानेवारी) : परभणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजीत बालमहोत्सवाचे आज  इनडोअर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,बुद्धिबळ ,कॅरम, वकृत्व ,एकलगायन निबंध या स्पर्धेचे आयोजन केले होते.


यामध्ये बालविवाह, पर्यावरण, निसर्गचित्र हे रांगोळीचे विषय होते. तर वकृत्व स्पर्धेचे विषय सहा ते बारा  वयोगट यामध्ये माझे आदर्श व्यक्तिमत्व स्वच्छ भारत आरोग्याचे महत्त्व तर 12 ते 18 वयोगटासाठी बालविवाह, कोचिंग कलासेस चा अतिरेक, सोशल मीडिया शाप की वरदान , निबंध स्पर्धेकरीता सहा ते बारा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी माझा परभणी जिल्हा, माझे आवडते कार्टून ,बालविवाह, तर बारा ते अठरा वयोगटासाठी तयाचे व्यर्थ न हो बलिदान, विवाहाचे योग्य वय, एका शेतकऱ्याचे आत्मवृत्त हे विषय होते. तर चित्रकलासाठी सहा ते बारा वयोगटासाठी माझी शाळा, कार्टून ,माझा परिसर तर बारा ते अठरा व गटासाठी बालविवाह घोषवाक्य सहित, बालकांचे हक्क ,कर्तुत्ववान महिला हे स्पर्धेचे विषय होते. यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय अशी क्रमांक काढले आहेत.

स्पर्धकांनी या बाल महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बाल महोत्सवाचा समारोप दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. समारोपाच्या  दिवशीच सांस्कृतिक स्पर्धा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या