🌟पुर्णेत आज दि.०६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून नगर पालिका सभागृहात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन.....!


🌟शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन🌟

🌟सत्कार सोहळ्यास जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक तथा आयपीएस अधिकारी रागसुधा आर यांची उपस्थिती🌟


पुर्णा (दि.०६ जानेवारी) - पुर्णा शहरातील नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आज शनिवार दि.०६ जानेवारी रोजी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास दर्पण दिनाचे औचित्य साधून शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका व शहर शाखेच्या वतीने सामाजिक/राजकीय/प्रशासकीय/व्यापार उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन तसेच तालुक्यातील विकासात्मक वाटचालीत जनहीताशी बांधिलकी जोपासत उल्लेखणीय वृत्तांकन करीत जनसामांन्यांच्या न्याय हक्कासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या पत्रकारांच्या भव्य सत्कार समारंभासह दैनिक क्रातिशस्त्र वृत्तपत्राच्या 'दर्पण दिन विशेषांकाच्या प्रकाशनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक सत्कार सोहळ्याचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष कर्तृत्ववान जिल्हा पोलिस अधिक्षक तथा आयपीएस अधिकारी सन्माननीय रागसुधाजी आर.या करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष उत्तमराव दादा कदम हे राहणार आहेत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद तालुक्यातील जनसामान्यांच्या हृदयातील लोकप्रिय धाडसी नेतृत्व माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष अण्णा एकलारे हे भुषवणार आहेत.


दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भव्य सत्कार समारंभात नांदेड येथील जेष्ठ समाजसेवी तथा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे दोन वेळेस अध्यक्षपद भुषविलेले सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन यांना सामाजिक क्षेत्रात तर  पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांना प्रशासकीय क्षेत्रात तर हिराजी भोसले यांना शैक्षणिक क्षेत्रात तर अशोकराव कुल्थे यांना व्यापार क्षेत्रात, जनार्धन आवरगंड यांना कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात तर पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांना राजकीय क्षेत्रात तर युवा उद्योजक नितीन कैलास कापसे यांना उद्योग क्षेत्रात तर सुरेश नामदेवराव शिंदे यांना कृषी पुरक उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


दर्पण दिन अजित न्युज हेडलाईन्स या वेब वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित या भव्य सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्हा शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विशाल कदम,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी गोपाळ काटोले साहेब,बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष नितीन उर्फ बंटी कदम, माजी नगरसेवक ॲड.राजेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अमजद भैय्या नुरी,नगर सेवक सुनील भैय्या जाधव,ॲड.रोहिदास जोगदंड आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या भव्य सत्कार सोहळ्यास पुर्णेकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य निमंत्रक तथा जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,सचिव तथा जेष्ठ पत्रकार स.रविंदरसिंघ मोदी उपाध्यक्ष स.हरदयालसिंघ संधू, सहसचिव तथा माजी नगरसेवक देवेंद्र राठोड संयोजक चौधरी अजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुर्णा तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मुजीब कुरेशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुर्णा तालुका प्रसिद्धी प्रमुख धम्मपाल हानवते,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या