🌟परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियांतर्गत मंदिरांच्या स्वच्छतेसाठी महास्वच्छता अभियान.....!


🌟मोहीम सर्वत्र राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे🌟

परभणी (दि.१९ जानेवारी) : परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान (डीप क्लिनिंग) अंतर्गत मंदिर परिसरांची स्वच्छता करणे सुरू आहे. हे अभियान मोहीम स्वरूपात राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.

            19 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मधील मंदिर व मंदिरांच्या परिसरांची स्वच्छता करण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सुचित केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनानुसार जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत मंदिर परिसरांची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मंदिर परिसरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे.

            या पार्श्‍वभूमीवर आधारित शुक्रवारी (दि.19) जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजेंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये शालेय विद्यार्थी, महिला मंडळी, युवक मंडळी आणि ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

            यावेळी स्वच्छता मोहिमेसाठी नृसिंह संस्थानचे अध्यक्ष मंचकराव वाघ, सरपंच सौ. कौशल्याबाई येडके, उपसरपंच ज्ञानोबा वाघ, ग्रामविकास अधिकारी मधुकर पांचाळ, ग्रामसेवक संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वाघ, अशोक वाघ, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल वाघ, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर वाघ, इंद्रोबा मडके,  शाळेचे मुख्याध्यापक निलपत्रेवार, जिल्हा परिषदेतील माहिती शिक्षण व संवाद तज्ञ ज्ञानेश्‍वर गायकवाड, समूह समन्वयक मुकुंद वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या