🌟पुर्णा नगर परिषदेतील नौकरशाही बेलगाम ? प्रशासकीय कारभार ठप्प : अनेक कर्मचारी कार्यालयात राहतात गैरहजर...!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मनसेची मागणी🌟


पुर्णा (दि.११ जानेवारी) - पुर्णा नगर परिषदेकडे प्रशासकीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांचे कामाच्या वाढत्या व्यापामुळे दुर्लक्ष होत असल्याने नगर परिषदेतील नौकरशाही बेलगाम झाल्याचे निदर्शनास येत असून कर्मचाऱ्यांअभावी प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याने निदर्शनास येत आहे आज गुरुवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी १० : २० वाजेच्या सुमारास नगर पालिकेत कर्मचारीच उपस्थित नसल्याचे आढळल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राज ठाकर यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी मनसे शहराध्यक्ष ठाकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की नगर पालिकेत वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा पगार रद्द करण्यात येईल अशी नोटीस दि.०१ जानेवारी २०२४ रोजी बजावण्यात आली तरी देखील नगर पालिकेतील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रशासकीय अधिकारी डापकर यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नगर पालिकेसमोर तीव्र आंदोलन करेल व याची पूर्णतः जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा देखील मनसेच्या वतीने शहराध्यक्ष राज ठाकर यांच्याकडून देण्यात आला आहे..... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या