🌟विद्यार्थ्यांनी सादर केले सुंदर नृत्याचे प्रदर्शन : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.सुर्यकांत काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा : पुर्णा शहरातील सम्राट अशोक रोड परिसरातील समता विद्यालयात गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी विद्यालय प्रशासनाच्या वतीने वार्षिक स्नेसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यकलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी स्नेहसंमेलन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विधीज्ञ ॲड. सूर्यकांत काळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुजाता मानवते मॅडम,सवित्रा माता फुले प्राथमिक विद्यालय पंचशील नगर पूर्णा येथील श्री नागरगोजे सर,तसेच समता विद्यालय येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षक श्री रावळे सर,नासीर सर,कानडखेडचे माजी सरपंच तुकाराम सालपे,श्रीकांत इप्पर,समता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंभोरे सर,जाधव डी.सी सरआदी मान्यवरांची उपस्थिती होती....
(समता विद्यालयात उत्कृष्ट शिक्षणासह विद्यार्थ्यांतील विविध कलागुणांना देखील वाव : सुंदर असे नृत्य सादर करतांना शाळेतील विद्यार्थी...)
(समता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सामुहिक नृत्य सादर करुन जिकली उपस्थित मान्यवरांनी मन..,)
0 टिप्पण्या