🌟पुर्णा तालुक्यातील सुहागण छत्रपती संभाजी विद्यालयाचे वकृत्व स्पर्धेत घवघवीत यश....!


🌟छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.सिद्धी बुचाले प्रथम तर कु.दिव्या बुचाले हिने द्वितीय क्रमांक पटकावला🌟

पुर्णा (दि.१२ जानेवारी) - पुर्णा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हायस्कूल येथे आज शुक्रवार दि.१२ जानेवारी २०२४ रोजी तालुका शिक्षण संवर्धन मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.सिद्धी गोपीनाथ बुचाले प्रथम तर कु.दिव्या दशरथ बुचाले हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

छत्रपती संभाजी महाराज विद्यालयातील कु.सिद्धी बुचाले व कु.दिव्या बुचाले या विद्यार्थिनींनी तालुक्यामधून प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल केले सदरील विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक वाघमारे सर व शिवाजी सारंग सर यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शक शिक्षक वाघमारे  तसेच शिवाजी सारंग  यांचे स्वागत शाळेचे  अध्यक्ष हिराजी भोसले  उपाध्यक्ष बळीरामजी भोसले सचिव दिलीप माने मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या